आजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन; सत्ताधारी, विरोधक आमने-सामने

मोदी सरकारच्या 5 वर्षांच्या कारकीर्दीतील राष्ट्रपतींचे हे सहावं अभिभाषण असणार आहे. पूर्ण अर्थसंकल्पाची कल्पना सोडून मोदी सरकारने 'अंतरिम अर्थसंकल्प' मांडण्याचे ठरवलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Jan 31, 2019 09:03 AM IST

आजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन; सत्ताधारी, विरोधक आमने-सामने

मुंबई, 31 जानेवारी : आजपासून संसदेचं बजेट अधिवेशन सुरू होतं आहे. संसदेच्या ऐतिहासिक केंद्रीय कक्षात लोकसभा आणि राज्यसभेच्या सदस्यांना संबोधून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने या 'अर्थसंकल्पीय' अधिवेशनाचा प्रारंभ होणार आहे.

मोदी सरकारच्या 5 वर्षांच्या कारकीर्दीतील राष्ट्रपतींचे हे सहावं अभिभाषण असणार आहे. पूर्ण अर्थसंकल्पाची कल्पना सोडून मोदी सरकारने 'अंतरिम अर्थसंकल्प' मांडण्याचे ठरवलं आहे. हे अधिवेशन १३ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे.

निवडणुकीपूर्वीचं शेवटचं बजेट सादर केलं जाणार असल्यानं हे अधिवेशन वादळी ठरणार यात शंकाच नाही. ईव्हीएमच्या जागी मतपत्रिका, बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांचे प्रश्न आदी ज्वलंत मुद्यांवरून मोदी सरकारला घेरण्याचा विरोधकांचा या अधिवेशनात प्रयत्न असणार आहे.

अर्थमंत्री पीयूष गोयल शुक्रवारी अंतरिम अर्थसंकल्प सादर करतील. या अर्थसंकल्पात मोदी सरकार विविध समाजांच्या कल्याणाशी संबंधित अनेक उपाययोजना जाहीर करतील अशी आशादेखील व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, देशातल्या शेतकऱ्यांनी कमाल केली असून त्यांनी विक्रमी अन्नधान्य पिकवलं, पण अतिरिक्त झालेल्या अन्नधान्यामुळंच देशात शेतमालाच्या बाजारात मंदी आली. त्यामुळे येत्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे संकेत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिले होते. 'सीएनबीसी टीव्ही18' च्या बिझनेस लिडरशीप समिटमध्ये बोलताना त्यांनी हे संकेत दिले होते. शेतकऱ्यांच्या कष्टांचं मोल सरकारला माहिती असल्याचंही त्यांनी सांगितलं.

Loading...

त्यामुळे आता आगामी लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर सादर होणारं हे अर्थसंकल्प कोणाच्या मतांमध्ये वाढ करणार हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे.


 SPECIAL REPORT : 'पबजी'वर का होतेय बंदी घालण्याची मागणी?


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 31, 2019 09:03 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...