अभिनेत्री परिणिती चोप्रा 'या' व्यक्तीला करतेय डेट, पाहा तिच्या बॉयफ्रेंडचे फोटो

अभिनेत्री परिणिती चोप्रा 'या' व्यक्तीला करतेय डेट, पाहा तिच्या बॉयफ्रेंडचे फोटो

काही दिवसांपासून परिणिती एका व्यक्तीला डेट करत असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

  • Share this:

मुंबई, 14 जुलै : बॉलिवूडमध्ये सध्या लिंकअप आणि ब्रेकअपच्या चर्चा सतत सुरू असतात. सध्या अभिनेत्री परिणिती चोप्रा सुद्धा अशाच एका कारणामुळे चर्चेत आहे. परिणिती तिचं खासगी आयुष्याबाबत बोलणं शक्यतो टाळते. तिच्या लव्ह लाइफ बद्दलही फारसं कोणाला माहित नाही. पण काही दिवसांपासून परिणिती एका व्यक्तीला डेट करत असल्याच्या चर्चा सुरू आहेत. मीडिया रिपोर्ट नुसार परिणिती मागच्या बऱ्याच काळापासून एका व्यक्तीला डेट करत आहे आणि तिच्या सर्व जवळच्या व्यक्तींना याबाबत माहिती आहे.

मीडिया रिपोर्टनुसार परिणिती या व्यक्तीला 2017 पासून डेट करत आहे. ही व्यक्ती इतर कोणी नाही तर बॉलिवूडमधील प्रसिद्ध असिस्टंट डायरेक्टर चरित देसाई आहे. परिणिती तिच्या रिलेशनशिप बद्दल कधीच बोलताना दिसत नाही. पण नुकत्याच एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत परिणितीला चरित बाबत प्रश्न विचारण्यात आलं. त्यावर बोलताना परिणिती म्हणाली, माझ्या कुटुंबीयांना आणि मित्रपरिवाराला सर्व माहित आहे. प्रियांका चोप्राच्या लग्नात चरित आणि परिणिती एकत्र दिसले होते.

सलमानच्या एक्स गर्लफ्रेंडनं शेअर केला हॉट फोटो, अर्जुन कपूरनं केली ‘ही’ कमेंट

परिणिती म्हणाली, मी कधी ही गोष्ट स्वीकारलीही नाही आणि नाकारली नाही. माझं कुटुंबं आणि मित्रपरिवार सर्वांना सत्य काय आहे हे माहित आहे. हे माझं खासगी आयुष्य आहे आणि म्हणूनच मला यावर काहीही प्रतिक्रिया द्यायची नाही. चरित देसाईनं करण जौहरच्या धर्मा प्रोडक्शनच्या अनेक सिनेमांसाठी असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम पाहिलं आहे. याशिवाय त्यानं प्रियांका- हृतिकच्या ‘अग्निपथ’ सिनेमासाठी असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केलं आहे.

सलमान सुद्धा घेणार ‘नच बलिये 9’मध्ये भाग, कोण असेल त्याची जोडीदार

परिणितीचा आगामी सिनेमा 'जबरिया जोड़ी' प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला होता. त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद लाभला. या सिनेमात परिणिती सिद्धार्थ मल्होत्रा सोबत काम करताना दिसणार आहे. याशिवाय परिणिती सायना नेहवालच्या बायोपिकची जोरदार तयारी करत आहे. यासाठी ती बॅडमिंटनचे धडे घेत असून अनेकदा ती याचे फोटो आणि व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.

‘या’ अभिनेत्रीवर कोसळला दुःखाचा डोंगर, अमरनाथ यात्रेला जाताना वडीलांचा मृत्यू

================================================================

VIDEO: मलायका अरोराच्या फिटनेसचं रहस्य काय?

First published: July 14, 2019, 3:49 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading