परिणीती चोप्राने अक्षय कुमारला दिले पैजेत हरलेले पैसे, शेअर केला फोटो

परिणीती चोप्राने अक्षय कुमारला दिले पैजेत हरलेले पैसे, शेअर केला फोटो

'केसरी' सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान जेव्हाही वेळ मिळायचा आम्ही लूडो किंवा पत्ते खेळायचो. या दरम्यान आम्ही अनेकदा पैजही लावली. यात मी खुपदा पैसे हरलीही आहे.

  • Share this:

मुंबई, 18 मार्च- गेल्या शनिवारी अक्षय कुमार आणि परिणीती चोप्रा त्यांच्या आगामी ‘केसरी’ सिनेमाच्या प्रमोशनसाठी कपिल शर्माच्या कॉमेडी शोमध्ये गेले होते. यावेळी परिणीती म्हणाली की, सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान अक्षयशी लावलेल्या अनेक पैजेत परिणीती हरली असल्याचं तिने मान्य केलं. अक्षयने यावर परिणीतीची थट्टा करत म्हटले की, ‘पैजेत ती पैसे हरली पण अजूनपर्यंत तिने मला ते पैसे दिले नाही.’ आता अक्षयची ही तक्रार दूर करत परिणीतीने त्याला पैसे दिले आहेत. तसेच अक्षयला पैसे देतानाचा फोटोही तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

परिणीतीने कपिल शर्माच्या शोमध्ये सांगितलं की, 'केसरी' सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान जेव्हाही वेळ मिळायचा आम्ही लूडो किंवा पत्ते खेळायचो. या दरम्यान आम्ही अनेकदा पैजही लावली. यात मी खुपदा पैसे हरलीही आहे. परिणीतीची ही गोष्ट ऐकून अक्षय गप्प बसा नाही तो पुढे म्हणाला की, ‘परिणीती तू एवढ्या प्रेमाने सांगते यावरून वाटतं की पैज हरल्यानंतर तू मला फार मोठा चेकच दिलास.’ यानंतर अक्षय म्हणाला की, परिणीती पैज हरली पण तिने आजपर्यंत मला एकही रुपया दिलेला नाही.

View this post on Instagram

Aaj bahega jo mera lahu, vo Kesari. @akshaykumar

A post shared by Parineeti Chopra (@parineetichopra) on

परिणीतीने अक्षयच्या या तक्रारीनंतर इन्स्टाग्रामवर त्याला २ हजाराची नोट देतानाचा फोटो शेअर केला. अक्षय आणि परिणीतीच्या या फोटोवर कमेंट करत रितेश देशमुख म्हणाला की, ‘अक्षय कुमार सर्वात जास्त कर भरणारा अभिनेता कसा झाला हे आता तुम्हा सर्वांना कळलं असेल. त्याच्या कमाईत आम्ही सर्व कलाकार मदत करतो. अक्षयकडे खूप सारे खेळ आहेत. त्याच्याकडे स्वतःचं मिनी ऑलम्पिक आहे.’

VIDEO: मनोहर पर्रिकरांना अखेरचा निरोप देण्यासाठी पोहोचले मोदी

First published: March 18, 2019, 8:38 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading