राजकीय भवितव्य धोक्यात आलं तरी मोदींनाच पाठिंबा देत राहीन- परेश रावल

राजकीय भवितव्य धोक्यात आलं तरी मोदींनाच पाठिंबा देत राहीन- परेश रावल

परेश रावल हे लोकसभेचे खासदार असून निस्सिम मोदी भक्त आहेत. रावल पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक करताना थकत नाहीत.

  • Share this:

‘संजू’ सिनेमातील सुनील दत्त यांच्या भूमिकेसाठी सर्व स्थरातून कौतुक झाल्यानंतर परेश रावल आता पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. URI: The Surgical Strike या सिनेमात परेश रावल यांनी पंतप्रधानांचे नॅशनल सिक्रिटी अडवायझरची भूमिका साकारली आहे. या सिनेमासंदर्भात मुलाखत देताना रावल पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक करताना थकत नव्हते.

परेश रावल हे लोकसभेचे खासदार असून निस्सिम मोदी भक्त आहेत. मुलाखतीत रावल यांना त्यांच्या राजकीय करिअरबद्दल विचारले असता ते म्हणाले की, ‘निवडणुका असल्या नसल्या तरी मी नेहमीच मोदींना पाठिंबा देत राहीन.’

रावल यांनी अनेक कार्यक्रमात खुलेपणाने मोदींचं कौतुक केलं आहे. ते स्वतःही ही गोष्ट नाकारत नाहीत. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुका ते लढवणार का असा प्रश्न विचारला असता त्यांनी यावर कोणतंही उत्तर दिलं नाही.

उरी सिनेमाबद्दल बोलायचे झाले तर या सिनेमात विकी कौशल आणि यामी गौतम यांच्या मुख्य भूमिका आहेत. आदित्य धार यांना या सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून येत्या ११ जानेवारीला हा सिनेमा प्रदर्शित होत आहे.

Special Report : कोमात गेलेलं बाळ 40 दिवसांनंतर शुद्धीवर, डॉक्टरांनाही अश्रू अनावर

First published: January 8, 2019, 3:10 PM IST

ताज्या बातम्या