कोरोनामुळे पालक घाबरले, मुलांना लसीकरणासाठीही बाहेर नेत नाहीत, जगातली 10 कोटी मुलं धोक्यात

कोरोनामुळे पालक घाबरले, मुलांना लसीकरणासाठीही बाहेर नेत नाहीत, जगातली 10 कोटी मुलं धोक्यात

लसीकरणाचं दर मोठ्या प्रमाणात कमी झाला असल्याने धोका वाढला आहे. त्यामुळे लहान मुलांना गंभीर आजार होण्याची शक्यता आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 25 एप्रिल : कोरोना व्हायरसमुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे देशातले सगळे व्यवसाय ठप्प झाले आहेत. लोकांना घराच्या बाहेर पडण्यावर बंदी घातली आहे. या कोरोनाच्या वाढत्या फैलावामुळे लोक आता डॉक्टरांकडे जाण्यासाठीही घाबरत आहेत. खरंतर लहान मुलांना आरोग्यासाठी वारंवार लस दिली जाते. पण त्यासाठीसुद्धा लोक रुग्णालयात जात नसल्याचं तपासात समोर आलं आहे. त्यामुळे आरोग्य तज्ज्ञांना भीती आहे की, यातून लहान मुलांमध्ये आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात.

लसीकरणाचं दर मोठ्या प्रमाणात कमी झाला असल्याने धोका वाढला आहे. त्यामुळे लहान मुलांना गंभीर आजार होण्याची शक्यता आहे. संसर्गजन्य रोगांवर काम करणाऱ्या अमेरिकन अॅकॅडमी ऑफ बालरोगशास्त्र समितीचे सदस्य डॉ. सीन टी. ओलेरी यांच्या मते, "जर लसीकरणात अशीच घट कायम राहिली तर, कॅविड -19सह असलेल्या लसींमध्येही रोग पसरण्याची शक्यता आहे."

...आणि अखेर तो क्षण आला, कोरोना संक्रमित महिलेच्या आयुष्यातला सगळ्यात आनंदी प्रस

पेडिएट्रिक इलेक्ट्रॉनिक हेल्थ रेकॉर्ड कंपनीने अमेरिकेतील 1000 क्लिनिकमधून गोळा केलेल्या माहितीनुसार, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात लहान मुलांच्या लसींमध्ये 50 टक्के , डिप्थीरियामध्ये 42 टक्के आणि खोकल्याची लस आणि एचपीव्ही लसीकरण 73 टक्के घट झाली आहे.

प्रेयसीने खेळला प्रेमाचा डबल गेम, रंगे हात पाहिल्यावर प्रियकराने केला खेळ खल्लास

इतकंच नाही तर सरकारने सुरू केलेली मोफत लसही मार्चच्या सुरूवातीपासूनच घटल्याचं दिसून आलं आहे. युनिसेफ आणि डब्ल्यूएचओ आंतरराष्ट्रीय संस्थेनं अलीकडेच अहवालात म्हटलं आहे की, दोन डझनहून अधिक देशांमध्ये राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रम पार पडले आहेत. सुमारे 10 कोटी मुलं या आजाराच्या तोंडाळी उभी आहेत. त्यामुळे आता सरकारला वेगळीच चिंता वाटत आहे.

लॉकडाऊनमुळे घरात वाहिला रक्ताचा पाट; चाकू, स्क्रूडायव्हरने जोडप्याला संपवलं

First published: April 25, 2020, 4:34 PM IST

ताज्या बातम्या