S M L

शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थिनीचा विजेचा शाॅक लागून दुर्दैवी मृत्यू

शाळा आणि महावितरणाच्या हलगर्जीपणामुळे चंदाचा बळी गेलाय.

Sachin Salve | Updated On: Jun 17, 2017 04:10 PM IST

शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थिनीचा विजेचा शाॅक लागून दुर्दैवी मृत्यू

17 जून : परभणीमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेत पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांनीचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झालाय. चंदा ढोले असं या मुलीचं नाव आहे.

पाथरीतल्या हदगावच्या जिल्हा परिषदमध्ये शिकणारी 11 वर्षांची चंदा ढोले पहिल्या दिवशी शाळेत आली. शाळेमध्ये असणाऱ्या वीजेच्या खांबाचा जोरदार शॉक चंदाला लागला आणि त्यात तीचा मृत्यू झाला.  शाळा आणि महावितरणाच्या हलगर्जीपणामुळे चंदाचा बळी गेलाय.

जिल्हा परिदेच्या उपाध्यक्षा भावना नखाते याच हदगावातल्या आहेत.  तरीही त्यांचं आपल्या गावातल्या शाळेकडे लक्ष नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केली. चंदा ढोलेच्या मृत्यूप्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापक आणि महावितरण अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करावी,अशी मागणी ग्रामस्थांनी केलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 17, 2017 04:10 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close