VIDEO : माझा मराठा मोर्चाला पाठिंबा,मुस्लिम तरुणाने केलं मुंडन

VIDEO : माझा मराठा मोर्चाला पाठिंबा,मुस्लिम तरुणाने केलं मुंडन

मराठा क्रांती ठोक मोर्चा ला दिवसें दिवस पाठिंबा वाढत असून आज पाथरीतील धरणं आंदोलनात एका मुस्लीम युवकासोबतच शिवसेनेच्या पाथरी पंचायत समिती 24 सदस्यांनी मुंडन करून शासनाचा निषेध केला.

  • Share this:

परभणी, 24 जुलै : मराठा क्रांती ठोक मोर्चा ला दिवसें दिवस पाठिंबा वाढत असून आज पाथरीतील धरणं आंदोलनात एका मुस्लीम युवकासोबतच शिवसेनेच्या पाथरी पंचायत समिती 24 सदस्यांनी मुंडन करून शासनाचा निषेध केला. पाथरी शहरात गेल्या सहा दिवसापासून मराठा क्रांती मोर्चा ला पाठिंबा देत बेमुदत धरणे आंदोलन सुरू असून या आंदोलनाला समाजाच्या विविध स्तरातून पाठिंबा मिळत असून पाथरीत वकील संघाने पाठिंब्याचे पत्र दिल्यानंतर शेख मोईनोद्दीन या मुस्लीम युवकाने राष्ट्रीय महामार्गावर बसून भाजप सरकारचा निषेध करत मुंडन करून घेतले.

मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर या गोष्टी कराव्या लागतील

याच वेळी शिवसेनेचे पाथरी पंचायत समितीचे सदस्य यांनी ही भाजपा सरकारचा निषेध करत मुंडन केले. यावेळी अनिल काळे, कृष्णा शिंदे, तुकाराम शिंदे, भागवत कोल्हे, तुकाराम पैळ, विष्णू काळे, संदिप टेंगसे, सोमेश गरड, अमोल टाकळकर यांनी धरणे आंदोलनाच्या तहसील कार्यालयासमोर  स्वत:चे मुंडन करून घेतले.

चंद्रकांत खैरेंना हुसकावलं

मुक मोर्चातून आक्रमक झालेल्या मराठा मोर्चात काल औरंगाबाद इथं मराठा जलसमाधी आंदोलनादरम्यान काकासाहेब शिंदे या तरूणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्यांच्या पार्थिवावर कायगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. दरम्यान, या अंत्यसंस्कारासाठी गेलेल्या खासदार चंद्रकांत खैरे यांना मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली. अंत्यसंस्कारच्या ठिकाणावरून खैरे यांना पिटाळण्यात आलं.

Maharashtra Bandh: 'मुख्यमंत्र्यांना मंदिरात जाऊ न देण्याने काय साध्य होतं?' व्यंकय्या नायडूंचा सवाल

कार्यकर्त्यांचा रोष पाहता चंद्रकांत खैरे यांनी तिथून निघून जाण्याचा निर्णय घेतला पण कार्यकर्त्यांवनी त्यांना त्यांच्या गाडीपर्यंत धक्काबुक्की आणि शिवीगाळ केली आणि तिथून पिटाळून लावलं. या सगळ्या प्रकारामुळे मराठा क्रांती मोर्चा आता आपल्या मागण्यांसाठी आणखीनच आक्रमक होत चालला आहे असं म्हणायला हरकत नाही.

औरंगाबादमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

महाराष्ट्रात सुरू असलेलं मराठा आरक्षण आंदोलन दिवसेंदिवस हिंसक होत चाललं आहे. औरंगाबादमध्ये शाम पाटगावकर या पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. शाम हे कायगाव टोक येथे बंदोबस्ताला होते. त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. याच ठिकाणी काकासाहेब शिंदे यांनी जलसमाधी घेतली होती. जमावाकडून दगडफेक होत असताना धावपळीत त्यांना हृदयविकाराचा झटका आला. औरंगाबादमध्ये आज एसटी वाहतूक सकाळपासून बंद आहे. तसेच आंदोलनामुळे आतापर्यंत सुमारे ९० लाखांचे नुकसान झाल्याची माहिती एसटीच्या सूत्रांनी दिली आहे. संपूर्ण जिल्ह्यात ठिकठिकाणी कडकडीत बंद असून मोठ्या संख्येने आंदोलक रस्त्यावर उतरले आहेत. संतप्त आंदोलकांकडून अग्निशमन दलाच्या गाडीची जाळपोळ करण्यात आली आहे.

मराठा समाजाच्या आंदोलनात असामाजिक तत्वं, शिवसेनेचा लोकसभेत प्रहार

दरम्यान मराठा आंदोलनात काही समाज कंटक घुसलेत त्यामुळे मराठा आंदोलन बदनाम करत असल्याचं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हंटलंय. आरक्षण देणं हे सरकारच्या हातात नाही. आरक्षणाचा निर्णय हा न्यायालयातच होणार आहे. आंदोलनं करून बसेस जाळून आरक्षण मिळणार नाही. त्यामुळं आंदोलन मागे घ्यावं असं आवाहन चंद्रकांत दादांनी केलंय. दक्षिण महाराष्ट्रात कोल्हापूर, सातारा आणि सांगली या तीनही जिल्ह्यात मराठा समाज आक्रमक झालाय. कोल्हापूरमध्ये आजपासून मराठा समाजाने बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. कोल्हापूर शहरातली अनेक दुकानं व्यापाऱ्यांनी स्वतःहून बंद केली असून, एसटीची सेवा ही तुरळक प्रमाणामध्ये सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत सात एसटी गाड्यांवर दगडफेक करण्यात आली आहे. सांगली आणि सातारा या दोन्ही जिल्ह्यातही अनेक ठिकाणी रास्तारोको करण्यात आले आहेत. दरम्यान, सकल मराठा मोर्च्याकडून उद्या नवी मुंबई बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 

 

First published: July 24, 2018, 4:58 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading