अलिबाग, 4 डिसेंबर : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने सर्व निर्बंध राज्य सरकारने हटवली. त्यामुळे गेली दीड-दोन वर्षे घरातच अडकून पडलेले नागरिक पिकनीकसाठी पर्यटनस्थळी दाखल होत आहेत. अलिबागमध्ये पॅरासेलिंग (parasailing in Alibaug) करण्यासाठीही नागरिक मोठी गर्दी करत आहेत. मात्र, हेच पॅरासेलिंग करत असताना दोरी तुटल्याने अपघात झाला आहे. अलिबागजवळील वल्सोली बीचवर हा प्रकार घडला आहे. ही संपूर्ण घटना मोबाइल कॅमेऱ्यात कैद झाली आहे. (Accident during parasailing in Alibaug, watch live video)
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील साकीनाका परिसरातील कुटुंबीय पिकनीकसाठी अलिबागला दाखल झाले होते. यावेळी त्यांना पॅरासेलिंग करण्याचा मोह आवरला नाही आणि त्यांनी पॅरासेलिंग करण्याचं ठरवलं. त्यानुसार दोन महिला पॅरासेलिंग करत होत्या पण पॅरासेलिंग करताना अचानक बोटीला बांधलेला दोर तुटला आणि त्या दोन्ही महिला समुद्रात कोसळल्या.
ही घटना अलिबागजवळील वस्लोली बीचवर घडली आहे. 27 नोव्हेंबर रोजी मुंबईतील साकीनाका येथील काहीजण फिरायला अलिबागला आले होते. त्यातील सुजाता नारकर व सुरेखा पाणीकर या दोन महिला पॅरासेलींग करण्यासाठी गेल्या यावेळी दोन्ही महिलांनी लाइफ जॅकेट परिधान केले होते त्यामुळे त्यांना कुठलीही दुखापत झाली नाहीये. पॅरासेलिंग करताना अचानक दोर तुटल्याने त्या दोघी खाली पाण्यात कोसळल्या त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. सुदैवाने या दोन्ही महिला बचावल्या आहेत. मात्र यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेचा मुददा ऐरणीवर आला आहे.
वाचा : पत्नीसमोरच पतीने गमावले प्राण, पॅरासेलिंग करताना समुद्रात बुडाल्याने तरुणाचा मृत्यू
बोटीवरील जीवरक्षकांनी दोघींनाही सुखरूप बाहेर काढले. यात कोणतही जीवीतहानी झाली नसली तरी पर्यटक आणि व्यावसायिकांनी सुरक्षेच्या सर्व उपाययोजना करणे गरजेचे आहे. मात्र आम्ही सर्व सुरक्षा व्यवस्था करत असतो यापुढेही सर्व काळजी घेतली जाईल असं पॅरासेलिंग व्यावसायिक संजय पाटील यांनी सांगितले.
पॅराग्लायडिंग परदेशी पर्यटकाच्या जीवावर बेतलं
दोन वर्षांपूर्वी साताऱ्यातील पाचगणीत पॅराग्लायडिंग करताना अपघात झाला होता. पाचगणी येथील टेबल लॅन्डवरून पॅराग्लायडिंग करणाऱ्या परदेशी पर्यटकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. फांगा फेक ओ असे या पर्यटकाचे नाव आहे. कोरियातून एक पॅराग्लायडिंग करणारा ग्रुप वाई-महाबळेश्वर येथे मुक्कामी आला होता.
सायंकाळी प्रमाणापेक्षा जास्त हवा असतानाही यातील काही जण हवेत झेपावले आणि त्यांनी हवेला भेदत आकाश गाठले. यातील एक वगळता उर्वरीत सर्वजण पुन्हा खाली उतरले मात्र फांग फेक ओ हा पुन्हा आलाच नाही. अंधार पडत चालल्यामुळे त्यांची सर्व टीम आणि स्थानिकांनी शोध घेण्यास सुरवात केली. दरम्यान फांग फेक ओ हा पाचगणीच्या दरी लगत असलेल्या अभेपुरी या गावातील एका झाडावर मृत अवस्थेत लटकताना मिळून आला. त्याचा मृतदेह ट्रेकर्सच्या आणि स्थानिकांच्या मदतीने खाली उतरवले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Live video viral, Raigad