मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

धनंजय मुंडेंची पॉवर, परळीत भाजपला धक्का देत तब्बल 'इतक्या' ग्रामपंचायतींमध्ये दणदणीत विजय

धनंजय मुंडेंची पॉवर, परळीत भाजपला धक्का देत तब्बल 'इतक्या' ग्रामपंचायतींमध्ये दणदणीत विजय

परळी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व धनंजय मुंडे समर्थक कार्यकर्त्यांचा मोठा विजय झाला आहे.

परळी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व धनंजय मुंडे समर्थक कार्यकर्त्यांचा मोठा विजय झाला आहे.

परळी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व धनंजय मुंडे समर्थक कार्यकर्त्यांचा मोठा विजय झाला आहे.

बीड, 18 जानेवारी : बीड जिल्ह्यातील 129 ग्रामपंचायतींपैकी 111 ग्रामपंचायतीसाठी मतदान झालं. जिल्ह्यात 18 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या होत्या. 1926 उमेदवार आपलं भवितव्य आजमावत होते. या निवडणुकांचा निकाल जाहीर होत असून बीड जिल्ह्यातील परळीतून राष्ट्रवादीचे नेते आणि पालकमंत्री धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

परळी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व धनंजय मुंडे समर्थक कार्यकर्त्यांचा मोठा विजय झाला आहे. तालुक्यातील एकूण 7 ग्रामपंचायतींमध्ये मतदान झाले. त्यापैकी 6 ठिकाणी पंकजा मुंडे आणि भाजपच्या गटाला धक्का देत राष्ट्रवादीने विजय मिळवला आहे.

मुंबईतील महिलेने केलेल्या बलात्काराच्या आरोपानंतर धनंजय मुंडे हे अडचणीत सापडले आहेत. अशावेळी मुंडे यांचा बालेकिल्ला असणाऱ्या परळीत नेमकं काय होतं, याची राज्यभर चर्चा होती. मात्र परळीतील जनतेने ग्रामपंचायत निवडणुकीत धनंजय मुंडे यांच्या बाजूनेच कौल दिला आहे.

कुठे कोण जिंकलं?

लाडझरी- NCP

मोहा- NCP

गडदेवाडी- NCP

सरफराजपुर- NCP

रेवली- बिनविरोध- NCP

वंजारवाडी- बिनविरोध- NCP

भोपळा- BJP

विखे पाटलांचा बाळासाहेब थोरातांना दे धक्का, ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा

Gram Panchayat Results : रोहित पवारांचा पुन्हा एकदा राम शिंदेंना 'दे धक्का'

नितेश राणेंना शिवसेनेनं दिला धोबीपछाड, ग्रामपंचायतीवर फडकवला भगवा

- जगमित्र या धनंजय मुंडे यांच्या कार्यालयात विजयी उमेदवारांचा जल्लोष सुरू

- गेवराई तालुक्यातील मादळमोही ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा

- मादळमोही 17 पैकी 17 जागा राष्ट्रवादी काँग्रेस

अमरसिंह पंडित गटाकडे सत्ता

- गेवराई तालुक्यातील गढी ग्रामपंचायतrवर राष्ट्रवादीची सत्ता, 11 पैकी 11 सदस्य अमरसिंह पंडित गटाचे निवडून आले.

First published:

Tags: Breaking News, Dhananjay munde, Gram panchayat, Pankaja munde