Home /News /news /

भाजप सरपंचाला मारहाण प्रकरणी पंकजांचा धनंजय मुंडेंना इशारा, म्हणाल्या...

भाजप सरपंचाला मारहाण प्रकरणी पंकजांचा धनंजय मुंडेंना इशारा, म्हणाल्या...

धनंजय मुंडे यांच्या समर्थकांनी सरपंच पांडुरंग नागरगौजे यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

बीड, 22 जानेवारी : बीडमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सरपंचाला मारहाण केल्याप्रकरणी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचं नाव घेता हे खपवून घेणार नाही असा  इशारा दिला आहे. बीडमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची गुंडगिरी पाहण्यास मिळाली आहे. धनंजय मुंडे यांच्या समर्थकांनी सरपंच पांडुरंग नागरगौजे  यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या प्रकरणी पंकजा मुंडेंनी ट्वीट करून तीव्र नाराजी व्यक्त केली. बीड जिल्यातील शांतता आणि सुख कायम राहावं, असं पालकत्व कोणाचं ही मिळावं मग ते कोणीही असो, अशी भावना होती पण सूडाच्या आणि सत्तेच्या लालसेने ग्रासलेले लोक समाजात शांतता ठेऊ शकत नाही. माझ्या कार्यकर्त्याला मारहाण दबाव दहशत हेच ध्येय दिसतंय. त्यामुळे हे खपवून घेतलं जाणार नाही. अशा इशारा पंकजा यांनी दिला. तसंच, सत्ता नाही तरी पुण्याई आहे आणि हिंमत ही आहे. सामाजिक न्याय करा अन्याय इथं चालत नाही, असा टोलाही पंकजा यांनी धनंजय मुंडे यांना लगावला. आज दुपारी पाटोदा तालुक्यातील रोहतवाडीचे भाजपचे सरपंच पांडुरंग नागरगौजे यांना राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली होती.  भाजपचे काम का करतो, असा जाब विचारून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी खुर्ची आणि लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. धनंजय मुंडे यांच्याबद्दल चुकीची पोस्ट टाकली होती म्हणून मारहाण करण्यात आली असा दावाही या कार्यकर्त्यांनी फेसबुक पोस्ट टाकून केला. तसंच फेसबुकवर पोस्ट टाकून पांडुरंग नागरगौजे यांना धमकीही देण्यात आली. 'धनंजय मुंडे यांच्याबद्दल बोलायची लायकी नाही. लायकीनुसार बोलं नाहीतर जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली होती.
Published by:sachin Salve
First published:

Tags: Beed, Pankaja munde

पुढील बातम्या