मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

वाघाच्या पोटी वाघीणच जन्माला येणार - पंकजा मुंडे

वाघाच्या पोटी वाघीणच जन्माला येणार - पंकजा मुंडे

वाघाच्या पोटी वाघीणच जन्माला येणार'. आक्रमक पणाचा वारसा मला वडिलांकडून मिळाला आहे.

वाघाच्या पोटी वाघीणच जन्माला येणार'. आक्रमक पणाचा वारसा मला वडिलांकडून मिळाला आहे.

वाघाच्या पोटी वाघीणच जन्माला येणार'. आक्रमक पणाचा वारसा मला वडिलांकडून मिळाला आहे.

शशी केवडकर,बीड,18 ऑक्टोबर  : 'वाघाच्या पोटी वाघीणच जन्माला येणार'. आक्रमक पणाचा वारसा मला वडिलांकडून मिळाला आहे. गोर गरिबांच्या प्रश्नावर मी कायम आक्रमकच असते असं सांगत ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना गुरूवारी मार्गदर्शन केलं. निमित्त होतं दसरा मेळाव्याचं. या मेळाव्याच्या निमित्तानं पंकजाताईंनी जोरदार शक्तिप्रर्शन करत आपली ताकद दाखवून दिली. भगवान गडाच्या वादानंतर गेली दोन वर्ष त्या भगवान बाबांच जन्मस्थळ असलेल्या सावरगावमध्ये दसरा मेळ्याव्याची सभा घेतात. त्या सभेत आक्रमक भाषण करून पंकजा मुंडेंनी आपली पुढची वाटचाल काय असेल याची चुणूक दाखवून दिली आणि धनंजय मुंडेंना आव्हानही दिलं.

भाजपचा सर्व्हे

भाजपने केलेल्या अंतर्गत सर्व्हेंच्या बातम्यांचा ग्रामविकासमंत्री  पंकजा मुंडे यांनी दसरा मेळाव्याच्या भाषणात जोरदार समाचार घेतला. निवडणुकीत लोक सर्व्हे पाहून मतदान करत नाहीत तर माणून बघून मतं देतात. या सर्व्हेमध्ये काही खासदार आणि काही आमदारांच्या जागा धोक्यात असल्याचं म्हटलं होतं. त्यात प्रीतम मुंडे यांचंही नाव असल्याची चर्चा होती. त्यामुळे पंकजा मुंडे यांनी अशा बातम्यांचा भाषणात उल्लेख करत निशाना साधला.

धनंजय मुंडेंवर टीका

‘लपून-छपून वार करू नका, तर समोर येऊन लढा’, असं म्हणत भाजप नेत्या आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनाही अप्रत्यक्षरित्या आव्हान दिलं. बीड जिल्ह्यातल्या सावरगाव येथे आयोजित दसरा मेळाव्यात त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित केलं. मी वाघची मुलगी आहे, वाघाची मुलगी वाघासारखीच राहणार त्यामुळच मी आक्रमक आहे असही त्यांनी सांगितलं.

‘पुढच्या वर्षी होणाऱ्या निवडणुकांतही भाजपचाच विजय होणार आहे’, असा दावाही पंकजा मुंडे यांनी या मेळाव्यात केला. दुसरीकडे त्यांनी भाजप अंतर्गत केल्या गेलेल्या सर्व्हेवरही निशाणा साधाला. त्या म्हणाल्या, ‘सर्व्हे बघून लोक मतदान करत नाहीत, तर माणूस बघून मतं दिली जातात.’

भगवानबाबांच्या स्मारकाचं उद्घाटन

बीड जिल्हामध्ये भगवानबाबांना मानणारा एक मोठा वर्ग आहे. पंकजा मुंडे यांची भगवानगडावरील दसरा मेळाव्याची परंपरा मागच्या वर्षीपासून खंडित झाली. गडाचे विश्वस्त नामदेवशास्त्री महाराज यांनी विरोध केल्याने पंकजा मुंडे यांना दसरा मेळाव्याचं ठिकाण बदलावं लागलं.

मागच्या वर्षीपासून पंकजा मुंडेचा दसरा मेळावा भगवानबाबांचे जन्मगाव असलेल्या सावरगाव याठिकाणी होत आहे.  याच सावरगावात पंकजा मुंडे यांच्याकडून भगवानबाबांच्या स्मारकांचं दसऱ्याच्या मुहर्तावर उद्घाटन करण्यात आलं. या ठिकाणी भगवान बाबांची 25 फुटांची मुर्ती उभारण्यात आलीय.

ऊसतोड कामगारांसाठी घोषणा

बीड जिल्हा हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या कामगारांना खूश करण्यासाठी पंकजा मुंडे यांनी 100 कोटींच्या मदतीची घोषणा केली आहे. तसंच उसतोड महामंडळाबाबतचा निर्णय शुक्रवार संध्याकाळपर्यंत होईल, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

VIDEO : पतीच्या मृत्यूनं खचून न जाता ती चालवतेय संसाराची 'टॅक्सी'

First published:

Tags: Dasara meleva, Maharashtra election, Pankaja munde, दसरा मेळावा, पंकजा मुंडे