सावरगावात आम्हाला भगवानबाबा दिसताय, पंकजा मुंडेंकडून नव्या भगवानगडाचे संकेत

नागपुरात संघाचा दसरा मेळावा होतो, मुंबई उद्धव ठाकरेंचा मेळावा होता, पण इथं गोरगरिबांचा मेळावा होत असताना पंकजा मुंडेंलाच का बंदी असते ?, माझं काय चुकलं ?, असा थेट सवाल महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी विचारलाय.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Sep 30, 2017 04:54 PM IST

सावरगावात आम्हाला भगवानबाबा दिसताय, पंकजा मुंडेंकडून नव्या भगवानगडाचे संकेत

30 सप्टेंबर : नागपुरात संघाचा दसरा मेळावा होतो, मुंबई उद्धव ठाकरेंचा मेळावा होता, पण इथं गोरगरिबांचा मेळावा होत असताना पंकजा मुंडेंलाच का बंदी असते ?, माझं काय चुकलं ?, असा थेट सवाल महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी विचारलाय. तसंच आम्हाला आता सावरगावात भगवानबाबा दिसताय असं सांगत नवा भगवानगड स्थापनेचं संकेतही दिले.

भगवानगडावर राजकीय पक्षांच्य मेळाव्यांना विरोधामुळे याही वर्षी पंकजा मुडे विरुद्ध भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांचा वाद चांगला गाजला. पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारल्यामुळे अखेर भगवानबाबाच्या जन्मभूमीत सावरगावात पंकजा मुंडेंनी दसरा मेळावा साजरा केला. या मेळाव्याला पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी अलोट गर्दी केली होती.

माझं काय चुकलं ?

भाषणाच्या सुरुवातील पंकजा मुंडे यांनी चक्रव्युहमध्ये अडकलेल्या अर्जुनाचं उदाहरण दिलं.  मी स्वत:ला प्रश्न विचारतेय की माझं काय चुकलं ?, हा दसरा मेळावा कुणासाठी आहे ?, मी राज्यभरात अनेक देवस्थानांच्या कार्यक्रमाला जाते, शिवनेरीला शिवरायांचा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी पण मला कुठेच बंदी नसते. पण फक्त भगवानगडावर मला बंदी असते. मला कोणताही वाद नको होता, माझ्या कार्यकर्त्यांचा जीव धोक्यात घालायचा नव्हता म्हणून भगवानबाबांच्या जन्मभूमीत मेळावा घेतला.

'आता तुमचे पाण्यात ठेवलेले देव काढा'

Loading...

महाराष्ट्रातील सर्व लोकांना विनंती करते, तुमचे पाण्यात ठेवलेले देव काढा, पंकजा मुंडे कुणाच्या घरात डाका टाकायला जात नाही. पंकजा मुंडे स्वत :च्या नावासाठी काम करत नाही. पंकजा मुंडे जनतेसाठी काम करते असंही पंकजांनी ठणकावून सांगितलं.

मलाच विरोध का ?

मला विमानतळावर आडवलं. मागच्या वेळीही अडवलं आणि याही वर्षी अडवलं. हजारो माणसं आली इथं आली ती कुणासाठी आली ती फक्त मुंडे साहेबांच्या नावाने आली. विचारांचं सोनं लुटण्यासाठी हे लोकं येत असतात. नागपुरात संघाचा दसरा मेळावा होतो, मुंबईत उद्धव ठाकरेंचा मेळावा होतो, आणि इथं गरिबांचा मेळावा होतो नेमका त्यालाच का विरोध ? असा सवाल पंकजा मुंडेंनी विचारला.

 भगवानबाबांच्या जन्मभूमीनं बोलावलं

भगवानगडावर महंत नामदेवशास्त्रींची मागील वर्षी डिसेंबरमध्ये भेट घेतली होती तेव्हा ते गादीवर बसलले होते. त्यांच्या पाया पडून त्याचा निरोप घेतला होता. त्यावेळी त्यांनी काळजी घ्या असा सल्ला दिला होता. पण आज मला भगवानगडावर येऊ दिलं नाही. त्याचं उत्तर मला मिळालं. कर्मभूमीनं नाकारलं तरी भगवानबाबांच्या जन्मभूमीनं आम्हाला बोलावलं. भगवानगडावर दर्शन झालं नाही पण जन्मभूमीत आम्हाला भगवानबाबा आता आम्हाला सावरगावात दिसताय. या मेळाव्यातून आम्ही सावरगावात आता भगवानबाबा दिसताय हा निर्णय आम्ही जनमानसातून घेतला अशी जनता कुणासोबत आहे हे एकदा पाहुन घ्या, पंकजा मुंडेच जनतेसोबत आहे. ज्या दिवशी माझ्यापेक्षा जास्त प्रेम करणारा व्यक्ती जर भेटला तर मी त्याचा हात धरून पुढे करेल आणि मी मागे होईल अशी भावनिक सादही घातला.

'त्यांच्या विचारांच्या धक्का लावू नका'

महंत म्हणाले होते, गडाचा श्वास मोकळा झाला. गडावर आज अडीच हजार पोलीस आहेत, तुमच्या केसांना धक्का लावण्याची आमची मानसिकता नाही, पण त्यांच्या विचारांच्या धक्का लावू नका अशा सल्ला वजा टोलाही पंकजा मुंडेंनी लगावला.

ही गर्दी कुणासाठी ?

वाद असता तर मिटवला असता, भेद असता तर मिटवला असता पण वाद आमच्यात नाही भेद आमच्यात नाही. रात्रीतून निर्णय घेऊन पंकजाला अयोग्य ठरवताय. आज एवढी गर्दी जमलीये. ती पंकजा मुंडेला अयोग्य ठरवण्यासाठी आहे का ? असा सवाल पंकजांनी उपस्थिती केला.

मक्केत सैतानाला दगड मारतात तसंच मी भगवानबाबाच्या मूर्तीबरोबर इथं तसं करणार, त्यामुळे ज्याला तुम्ही पापाचं प्रतिक म्हणून दगड माराल ? असंही पंकजा मुंडे म्हणाल्यात.

मुंडेंसाहेबांचं नाव मी का नाही घ्यायचं ?

मी मुंडे साहेबांचं नाव का घ्यायचं नाही ? ते तर माझे वडील आहेत, इतर लोक ते नाव घेतात मग मी का नाही ? असा सवालही त्यांनी थेट विचारला.  तसंच मी भगवानबाबाच्या जन्मभूमीचा विकास करीन. भगवान बाबांची मोठी मूर्ती उभारणार अशी घोषणाही पंकजा मुंडेंनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 30, 2017 04:54 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...