S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

नाक पुसता येत नव्हतं तेव्हा युवा मोर्चाचं अध्यक्ष केलं, पंकजा यांची धनंजय मुंडेंवर टीका

'पवार साहेबांनी स्वतःच्या जीवावर ऐवढा मोठा पक्ष निर्माण केला. पण अजित पावर, सुप्रिया सुळे, पार्थ पवार, रोहित पवार, ही घराणेशाही नाही का ?

Updated On: Mar 26, 2019 11:23 AM IST

नाक पुसता येत नव्हतं तेव्हा युवा मोर्चाचं अध्यक्ष केलं, पंकजा यांची धनंजय मुंडेंवर टीका

बीड, 26 मार्च : 'एवढीच हिंमत असेल तर बीडची लोकसभा निवडणूक लढवा. उद्या उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची वेळ आहे. तर अर्ज भरा आणि या मैदानात' असं खुलं आव्हान पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना दिलं आहे. स्वत: मागच्या दारानं यायचं आणि लोकांना पुढे करायचं. हे बीडची जनता कदापि खपून घेणार नाही' असा टोला पंकजा मुंडे यांनी लगावला आहे.

'राष्ट्रवादीला यांच्या पायगुणाने वाळवी लागली. आगोदर 5 आमदार होते ते सगळे गेले. जयदत्त क्षीरसागर यांच्या घरात राजकारण केलं. ते आज त्यांच्या मंचावर नाहीत. विमलताई मुंदडा गट नाराज आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचं काय 'ये अंदर की बात है, पुरी राष्ट्रवादी हमारे साथ है' असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

त्या पुढे म्हणाल्या की, 'नाक पुसता येत नव्हतं तेव्हा युवा मोर्चाचं अध्यक्ष केलं. जिल्हा परिषद लढवली तर सामान्य कार्यकर्त्यांनी पळताभुई केली' अशी घणाघाती टीका पंकजा मुंडे यांनी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे वाद जोर धरू लागला आहे. त्यामुळे या आरोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत.


पंकजा मुंडेंची पवार घराणेशाहीवर टीका...

धनंजय मुंडे यांनी वारंवार पंकजा मुंडे यांचं नाव पुढे करत भाजपवर घराणेशाहीचा आरोप केला. त्यावर पंकजा मुंडेंनी प्रत्त्युतर दिलं आहे. 'पवार साहेबांनी स्वतःच्या जीवावर ऐवढा मोठा पक्ष निर्माण केला. पण अजित पावर, सुप्रिया सुळे, पार्थ पवार, रोहित पवार, ही घराणेशाही नाही का ? गंगाखेडची नगरअध्यक्ष स्वत: बहीण आहे. गंगाखेडचा आमदार जावई झाला. ती घरानेशाही नाही का ? स्वतःचा भाऊ जिल्हा परिषद सदस्य, काकू ग्रामपंचायत सरपंच ही घरानेशाही नाही का?' असं म्हणत पंकजा मुंडे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे.

राहुलचा मास्टर स्ट्रोक, काँग्रेस अध्यक्षांची UNCUT पत्रकार परिषद

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 26, 2019 11:23 AM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close