मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

पंकजा मुंडेंना राष्ट्रवादीची ऑफर? मिटकरींनी जाहीर सभेत सांगितले भाजप सोडण्याचे कारण...

पंकजा मुंडेंना राष्ट्रवादीची ऑफर? मिटकरींनी जाहीर सभेत सांगितले भाजप सोडण्याचे कारण...

ज्या पद्धतीने तिकीट द्यायचं आणि सुडाचं राजकारण करून त्यांच्याच मुलीचा पराभव केला. रोहिणी खडसेंना हे लक्षात आलं. आता माझ्या पंकजा मुंडे यांच्याही लवकर लक्षात यायला पाहिजे

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Jalgaon, India
  • Published by:  sachin Salve

जळगाव, 29 ऑगस्ट :  'आता 12 आमदारांची यादी राज्यपाल लवकर जाहीर करतील. पण 12 आमदारांच्यायादीत पंकजा मुंडेंचं नाव नाही, पंकजांनी आता पावलं उचलावी, असं म्हणत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना एकाप्रकारे ऑफर देऊन टाकली आहे.

जळगाव जिल्ह्यातील बोदवडमध्ये राष्ट्रवादीची जनसंवाद यात्रा पार पडली. यावेळी बोलत असताना अमोल मिटकरी यांनी भाजपवर जोरदार टीका केली. तसंच, राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीबद्दल माहिती मिटकरींनी उघड केली.

गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे  यांच्या पुण्याईने भाजप पक्ष वाढला आहे. ज्या पद्धतीने तिकीट द्यायचं आणि सुडाचं राजकारण करून त्यांच्याच मुलीचा पराभव केला. रोहिणी खडसेंना हे लक्षात आलं. आता माझ्या पंकजा मुंडे यांच्याही लवकर लक्षात यायला पाहिजे. कारण, 12 आमदारांची यादी आहे, ती यादी राज्यपाल लवकरच मान्य करतील. मुळात राज्यपालच भाजपचे आहे. पण मला असं समजलं की दुर्दैवाने 12 आमदारांच्या यादीत पंकजा मुंडेंचं नाव नाही. त्यामुळे आपला पक्ष प्रामाणिकपणे वाढवणाऱ्यांचे पंख कसे छाटतात दिसते आहे. रोहिणी खडसे यांना पुढचं भविष्य लवकर कळलं, त्यांनी लगेच राष्ट्रवादीत प्रवेश केला. आता पंकजा ताईंना सुद्धा याची जाणीव असावी किंवा असेल, त्यामुळे त्यांनी पाऊल उचलावी, असं म्हणत मिटकरींनी एका प्रकारे पंकजांना थेट ऑफरच देऊन टाकली.

(आदित्य ठाकरेंच्या कार्यक्रमासाठी वीज चोरी; VIDEO समोर येताच महावितरणाची कारवाई)

प्रताप सरनाईक हे जेलमध्ये जाणार होते, पण ते तर शिंदे गटात गेले. यशवंत जाधव भाजपमध्ये गेले, त्यामुळे सगळे  भाजपच्या वॉशिंग पावडरमध्ये धुवून निघाले आहे.  भावना गवळींनी तर शिवबंधन काढून पंतप्रधान मोदी यांना राखी बांधली आणि ईडी पिडा टळो असं म्हटलं असेल. त्या पण  वाशिंग पावडरमध्ये  सारख्या साफ झाल्या आहेत, अशी टीकाही मिटकरींनी केली.

(ते कधी चुकीचं वागू शकत नाही'; किशोरी पेडणेकरांनी केलं शिंदेंचं कौतुक, पण पुढे..)

किरीट सोमय्या सारखा महामानव आपल्या महाराष्ट्रात आहे, असं म्हणत  मिटकरी यांनी सोमय्यांची नक्कल करत खिल्ली उडवली.

First published:

Tags: Lokmat news, Lokmat news 18, Marathi news, पंकजा मुंडे