मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

पंतप्रधान मोदींच्या विधानावरून पंकजा मुंडेंची सारवासारव, म्हणाल्या...

पंतप्रधान मोदींच्या विधानावरून पंकजा मुंडेंची सारवासारव, म्हणाल्या...

मी शत्रू विषयी वाईट बोलत नाही. मी ज्यांच्या विचारांचा वारसा चालवते, त्यांच्या बद्दल मी काही बोलणार नाही

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Bid (Beed), India
  • Published by:  sachin Salve

बीड, 05 ऑक्टोबर :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विचार घेऊन मी वारसा चालवत आहे. त्यांनी 370 कलम आणले, जे या देशाला शक्य नाही ते करून दाखवलं. या देशात बहुमतात सरकार आणून दाखवलं. त्यांचा वारसा मी चालवत आहे. काय वेगळे विचार आहे, मी गोपीनाथ मुंडे यांचा वारसा चालवत आहे. कुणी मोबाइलमध्ये अर्धवट क्लिप तयार करतात. मी शत्रू विषयी वाईट बोलत नाही. मी ज्यांच्या विचारांचा वारसा चालवते, त्यांच्या बद्दल मी काही बोलणार नाही, असं म्हणत पंकजा मुंडेंनी पंतप्रधान मोदींबद्दल केलेल्या विधानावर सारवासारव केली.

भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा बीडच्या सावरगाव घाट येथे दसरा मेळावा होत आहे. या मेळाव्यामध्ये पंकजा मुंडे यांनी जोरदार भाषण केलं.

मला एक जण म्हणाला, ताई शहरातील लोक राजकारण करत नाही. तुमच्यावर आरोप आहे, तुम्ही गर्दी करतात, मग राजकारणामध्ये गर्दी करतो हा काय गुन्हा आहे. नाशिकला देवीच्या दर्शनाला गेले तर लोकांची एकच गर्दी झाली. जेपी नड्डांनी मला सांगितलं, तुमची गर्दी तुमची ताकद आहे. अमित शहा दोन वेळा आले आहे. त्यांनी सुद्धा हेच म्हटलं आहे. माझ्या लोकांची गर्दी हे माझं प्रेम आहे. पंडीत दिनदयाळ उपाध्य यांचा आदर्श ठेवून मी राजकारण करते. यांचाच विचार घेऊन मी वारसा चालवत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विचार घेऊन मी वारसा चालवत आहे. त्यांनी 370 कलम आणले, जे या देशाला शक्य नाही ते करून दाखवलं. या देशात बहुमतात सरकार आणून  दाखवलं. त्यांचा वारसा मी चालवत आहे.  काय वेगळे विचार आहे,  मी गोपीनाथ मुंडे यांचा वारसा चालवत आहे. कुणी मोबाइलमध्ये अर्धवट क्लिप तयार करतात. मी शत्रू विषयी वाईट बोलत नाही. मी ज्यांच्या विचारांचा वारसा चालवते, त्यांच्या बद्दल मी काही बोलणार नाही, असं म्हणत पंकजा मुंडेंनी पंतप्रधान मोदींबद्दल केलेल्या विधानावर सारवासारव केली.

(Pankaja Munde Dasara Melava : मी थांबणार नाही, झुकणार नाही, पंकजा मुंडेंचा एल्गार)

मी 2019 निवडणुकीमध्ये पडले. तेव्हापासून कार्यकर्ते म्हणता की, हे मिळालं पाहिजे, ते मिळालं पाहिजे, पण मला काही मिळालं नाही तरी दु:ख नाही. समाजाची सीमा वाढवण्यासाठी, ताकद वाढवण्यासाठी होत असेल तर त्याचं कौतुक आहे. पण समाजाला बांधून ठेवण्यासाठी काही होत असेल तर ते बरोबर नाही. माझी लोक शेत आहे का बांधायला, ते समुद्र आहे. मी नरेंद्र मोदींच्या संस्कारामध्ये वाढले आहे. मी क्षमा करू शकते, पण तुम्ही क्षमा करू शकणार नाही, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.

(शिंदेंच्या दसरा मेळाव्यात स्टेजवर स्पेशल खूर्ची, त्या जागेवर कुणीच बसणार नाही)

'माना के औरे के मुकाबले, कुछ पाया नही हमनें, पर खुद को गिराकर कुछ उठाया नही हमने' अशी शायरी म्हणत माझ्यासाठी हा विषय संपला आहे, त्यांना करायचं असेल तर करतील, आपण 2024 च्या निवडणुकीला तयारी लागलं पाहिजे, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी मंत्रिमंडळाच्या घरवापसीच्या चर्चांना ब्रेक दिला आहे.

First published:

Tags: Marathi news