'आमच्या बंधूवर 420चा गुन्हा दाखल', पंकजा मुंडेंचा गंभीर आरोप

'आमच्या बंधूवर 420चा गुन्हा दाखल', पंकजा मुंडेंचा गंभीर आरोप

'एकाही शेतकऱ्यांचा रुपया मी ठेवणार नाही. माझ्या आईच्या नावाची जमीन गहाण ठेवून शेतकऱ्यांचं पैसे दिले आहेत.'

  • Share this:

सुरेश जाधव, प्रतिनिधी

बीड, 07 एप्रिल : 'धनंजय मुंडे यांनी कारखान्याच्या नावाने जमिनी लुबाडल्या. लोकांचे पैशे बुडवले, मयत माणसाच्या नावावरील जमीन जबरदस्ती स्वतःच्या नावावर करून घेतली. त्यामुळे यांच्यावर 420 चा गुन्हे दाखल आहेत. यांची चारशीट तयार होते. त्यामूळे धनंजय मुंडेंनी लोकांना सांगू नये' असा टोला पंकजा मुंडेंनी लगावला आहे.

'वैद्यनाथ कारखाना माझ्या बाबतीत असो की प्रीतम मुंडें बाबतीत पण वयक्तीक टीका हे दुर्दैव आहे. मी पक्षाची भूमिका म्हणून टीका करेल पण वयक्तीक कधी करत नाही. पार्थ पवार बाबतीत मला प्रश्न विचारलं तेव्हा त्यांची मी खिल्ली उडवली नाही. त्यांचा अपमान केलं नाही. मी पक्षाच्या भुमिके विरोधात राहिलं, वयक्तीक कुणावरही निंदा नालस्ती करणार नाही पण मात्र आमचे बंधू त्यांची ती सवय आहे' असंही त्या म्हणाल्या.

आज वैद्यनाथ कारखान्याची बदनामी एवढी केली. त्यांच्यामुळे मला त्रास होत आहे. एकाही शेतकऱ्यांचा रुपया मी ठेवणार नाही. माझ्या आईच्या नावाची जमीन गहाण ठेवून शेतकऱ्यांचं पैसे दिले आहेत. वेळ पडली तर माझ्या स्वतःचे वयक्तीक पैसे, जमीन गहाण ठेवेन आणि शेतकऱ्यांना पैसे देईन.'

यावर बोलताना त्यांनी विरोधकांवर टीका केली आहे. त्या म्हणाल्या की, 'मात्र विरोधक या बाबतीत चार-पाच भाड्याचे लोक कार्यकर्ते घेवून कारखान्यावर पाठवून रेकॉर्डिंग करून घेतलं. मी त्यांची तक्रार करत आहेत. वैद्यनाथ कारखाना आधी यांच्याकडेच होता. त्यांच्यामुळे तो अडचणीत आहे. आत्ता मी 70% लोकांचे पैसे दिले आहेत.'

राष्ट्रवादी नेस्तनाबुत करण्याचं काम धनंजय मुंडे यांनी केलं

'मागच्या निवडणुकीच्या काळात बीड जिल्ह्यात राष्ट्रवादीची प्रचंड शक्ती होती आणि ही शक्ती नेस्तनाबुत करण्याचं काम राष्ट्रवादीतील नव्या आमच्याकडून गेलेल्या नेत्यानं केलं. त्यामुळे या जिल्हय़ातील मोठय़ा प्रभावी नेत्यांच्या हाताखाली काम करणं हे अशक्य आहे. हे जयदत्त क्षीरसागर यांनी दाखवून दिलं. म्हणूनच प्रीतम मुंडेंच्या विजयाची गुडी उभारावी असं आवाहन राष्ट्रवादीच्या जयदत्त क्षीरसागर यांनी केला' असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.

VIDEO: 'जिथे भाजप-सेनेचे उमेदवार तिथे राज ठाकरेंनी हमखास जाहीर सभा घ्यावी'

First published: April 7, 2019, 11:47 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading