'आम्ही मतदारांना मटन आणि दारूच्या पार्ट्या देत नाहीत'

'आम्ही मतदारांना मटन आणि दारूच्या पार्ट्या देत नाहीत'

'मतदारांना भुलवण्यासाठी मटन-दारूच्या पार्ट्या आम्ही देत नाहीत' अशा शब्दात पंकजा मुंडेंनी विरोधकांवर टीका केली आहे.

  • Share this:

बीड, 10 एप्रिल : 'आम्ही सामन्या लोकांना चांगले रस्ते दिले, रेल्वे आणली, जलसंधारणाची कामं केली, लोकांच्या जीवनमान उंचावण्यासाठी आम्ही विकास दिला आहे. मतदारांना भुलवण्यासाठी मटन-दारूच्या पार्ट्या आम्ही देत नाहीत' अशा शब्दात पंकजा मुंडेंनी विरोधकांवर टीका केली आहे.

यावेळी बोलतांना पंकजा मुंडेंनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर निशाना साधला. बीड लोकसभा मतदार संघाच्या भाजपा-शिवसेना, रिपाई, रासप तसंच रयत क्रांती महायुतीच्या अधिकृत उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या प्रचारार्थ राज्याच्या ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे अंबाजोगाईच्या चनई इथे जाहीर सभेत बोलत होत्या.

'या जिल्ह्याला गोपीनाथराव मुंडेंचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. पण, मुंडेसाहेब अचानक हे जग सोडून गेले आणि मला आणि प्रीतम मुंडेंना या राजकारणात उतरावं लागलं. तुम्ही सर्वांनी प्रीतम मुंडेंना प्रचंड मतांनी निवडून देऊन दाखवून दिलं होतं की तुम्ही सर्वजण मुंडेसाहेबांवर किती प्रेम करता ते.' असं भावनिक आवाहनही पंकजा मुंडेंनी दिलं.

हेही वाचा: 'उद्धव ठाकरेंकडून माझी हकालपट्टी मान्य पण भाजप उमेदवाराला विरोधच'

यावेळी त्यांनी विरोधकांवर टीका केली. 'विरोधक म्हणतात की, या उमेदवाराची काय पत्रात आहे. ते विसरतात की, त्या एक उच्च शिक्षित उमेदवार आहेत. त्यांनी 70 वर्षांपासून रखडलेला रेल्वे मार्ग पूर्ण करण्याच्या मार्गावर आहे. त्यांनीं विकासाची अनेक कामं या जिल्ह्यात केली आहेत. तसंच राज्यभरात सर्वात जास्त राष्ट्रीय महामार्ग असलेला हा बीड जिल्हा झाला.' असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

'आम्ही जात पाहून काम करत नाही. त्यामुळे जात का  विचारायची?' असा सवाल त्यांनी जनतेला विचारला  कारण गोपीनाथ मुंडे यांनी जातीपातीचे राजकारण शिकवलं नाही असंही त्या म्हणाल्या.

VIDEO : गावाचं बोला, कांचन कुल यांच्या प्रचाराला गेलेल्या भाजप नेत्यांना बारामतीकरांनी सुनावलं

 

First published: April 10, 2019, 9:37 PM IST

ताज्या बातम्या