डॅमेज कंट्रोलसाठी भाजपने बोलावली बैठक, पंकजा मुंडे अद्याप गैरहजर!

डॅमेज कंट्रोलसाठी भाजपने बोलावली बैठक, पंकजा मुंडे अद्याप गैरहजर!

या बैठकीला मराठवाड्यातील महत्वाचे नेते उपस्थित राहणं अपेक्षित आहे. बैठकीच्या सुरवातीला पंकजा मुंढे उपस्थित नव्हत्या. पण त्या उपस्थित राहतील अशी प्रतिक्रिया हरिभाऊ बागडे यांनी दिली होती.

  • Share this:

औरंगाबाद, 09 डिसेंबर: औरंगाबादमध्ये भाजपची विभागीय आढावा बैठक सुरू झाली आहे. सत्ता स्थापन झाल्यानंतर भाजपची ही पहिली महत्त्वाची बैठक आहे. पण यासाठी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे या गैरहजर आहे. पंकजा मुंडे या भाजपवर नाराज आहे. त्यामुळे त्यांनी या बैठकीकडे पाठ फिरवली असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे

या बैठकीला मराठवाड्यातील महत्वाचे नेते उपस्थित राहणं अपेक्षित आहे. बैठकीच्या सुरवातीला पंकजा मुंढे उपस्थित नव्हत्या. पण त्या उपस्थित राहतील अशी प्रतिक्रिया हरिभाऊ बागडे यांनी दिली होती. पण त्या अद्याप आल्या नसल्यामुळे राजकीय चर्चा सुरू झाली आहे. तर पंकजा मुंढे सर्व जिल्ह्याच्या बैठकीला उपस्थित राहणे आवश्यक नाही. संध्याकाळी बीड जिल्ह्याच्या बैठकीला त्या उपस्थित राहतील अशी माहिती भाजप आमदाराकडून देण्यात आली आहे.

बैठकीला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित आहेत. या बैठकीत मराठवाड्याच्या जिल्ह्याचा आढावा घेण्यात येणार आहे. मराठवाड्यात मागील निवडणुकीमध्ये झालेल्या जय-पराजया विषयी तक्रारी बद्दल चिंतन केलं जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

इतर बातम्या - हैदराबादप्रमाणे आरोपीचा एन्काऊंटर करा, बलात्कार, हत्येनंतर नागपूर तापलं

खरंतर महाराष्ट्रात सत्तेच्या नाट्यात भाजपला शिवसेनेने धोबीपछाड दिला. त्याचा वचपा काढण्यासाठी भाजप आता तयारीला लागला आहे. शिवसेनेचा गड असलेल्या मुंबईत गेल्या तीन दशकांमध्ये शिवसेनेचा एकछत्री अंमल आहे. प्रचंड मोठं बजेट असलेल्या मुंबई महापालिकेत आपली सत्ता कायम राहावी म्हणून शिवसेना पूर्ण शक्ती पणाला लावते. शिवसेनेचा हा गड खालसा करण्यासाठी भाजपने आता कंबर कसली असून आज मुंबईत झालेल्या भाजपच्या महत्त्वाच्या बैठकीत यावर सविस्तर चर्चा करण्यात आली असून भाजपने त्यासाठी मेगा प्लान तयार केल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिलीय. त्यामुळे यापुढे भाजप आणि शिवसेनेत मुंबईत जोरदार लढत होणार आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले, 2022 मुंबई मनपा भाजपा एकहाती जिंकेल यासाठी जास्त काम येथे करू. 2022 मध्ये मुंबईत भाजपचा महापौर होईल हे आमचं टार्गेट आहे. त्यासाठी आम्ही आतापासूनच कामाला लागणार आहोत. त्यामुळेच दिवसभर आम्ही आज मुंबईवरच चर्चा केली. 30 तारखे पर्यंत मुंबई भाजपचा नवीन अध्यक्ष घोषणा होईल असंही ते म्हणाले.

महाविकास आघाडी सरकारचं खातेवाटप लांबल्याच्या घटनेवर पाटील म्हणाले, आमच्या बापाने आपला संसार नीट करावा हे सांगितलं विनाकारण दुसऱ्याच्या संसारात लक्ष नको यावर आता बोलायचे नाही. भाजपाने अजित पवार यांना क्लिनचिट दिले नाही. आताच्या सरकारच्या काळात अजित पवार यांच्याबाबत प्रतिज्ञापत्र दिलं आहे असंही त्यांनी सांगितलं. पाटील पुढे म्हणाले,1 ते 5 जानेवारी कालावधीत प्रदेश अध्यक्ष नवीन घोषणा होईल.

खडसे हे 1978 पासून भाजपा काम करत मोठे झाले. भाजपा संघटनेत खडसे यांचा मोठा वाटा आहे. ते नेते आहेत, ते वेगळा विचार करणार नाहीत. खडसे यांच्याशी दीर्घ चर्चा झाली. त्यांना आश्वासन दिले. जे चुकीचे झाले त्यांवर कारवाई करू असं त्यांना आश्वासन दिलं असंही त्यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 9, 2019 12:26 PM IST

ताज्या बातम्या