Home /News /news /

प्रेयसीसोबत मध्यरात्री पतीला पकडलं, भररस्त्यात घडला 'पती पत्नी और वो' सिनेमाचा सीन

प्रेयसीसोबत मध्यरात्री पतीला पकडलं, भररस्त्यात घडला 'पती पत्नी और वो' सिनेमाचा सीन

पत्नीनं दिराच्या मदतीनं पती आणि प्रेयसीला कसं पकडलं? रस्त्यात नेमकं काय घडलं.

    पानिपत, 11 ऑगस्ट : पती पत्नी आणि वो सिनेमाचा सीन भररस्त्यात मध्यरात्री पाहायला मिळाला आहे. एका महिलेनं पतीला प्रेयसीसोबत कारमध्ये रंगेहाथ पकडलं. रात्री अडीच वाजेपर्यंत भररस्त्यात धुमशान सुरू होतं. नेमकं काय सुरू आहे हे पाहण्यासाठी आजूबाजूचे लोकही रस्त्यावर जमा झाले होते. नेमका काय घडला प्रकार रविवारी हरियाणातील पानिपत शहरात रात्री उशिरा पती आपल्या प्रेयसीसोबत कारमधून जात असताना पत्नी आणि दिरानं मिळून त्यांना रंगेहात पकडलं. रात्री अपरात्री बाहेर जाणं, घरी न येणं अशा गोष्टींमुळे पत्नीला त्याच्यावर संशय आला त्यामुळे पत्नीनं त्याच्यावर नजर ठेवण्यास सुरुवात केली. रविवारी रात्री जेव्हा पत्नीनं घरी बोलवलं तेव्हा पती न आल्यानं महिलेला संशय आला. दिराच्या मदतीनं तिने पतीला प्रेयसीसोबत रंगेहात पकडलं. एशियन न्यूजनं दिलेल्या वृत्तानुसार घरापासून काही अंतरावर प्रेयसी आणि पती कारमध्ये बसत असल्याचं पाहून पत्नीनं रेलिंगवरून उडी मारली आणि दोघांनाही पकडलं. दिरानं गाडीची चावी काढून घेतली आणि जाब विचारला. यावर प्रेयसीनं उडवा उडवीची उत्तरं दिली. हे वाचा-पुण्यातील मन सुन्न करणारी घटना, मावशीने भाचीला दाखवले पॉर्न व्हिडिओ! 'टाळी एका हातानं वाजत नाही, तो जर माझ्यासाठी मरायला तयार आहे तर मी त्याच्यासोबत का जाऊ नये', असा सवालही प्रेयसीनं केला. हे संपूर्ण प्रकरण हाताबाहेर जात असल्याचं पाहून दारूच्या नशेत असलेल्या पतीनं स्वत:च्या गाडीची तोडफोड करण्यास सुरुवात केली. नेमका कशाचा आवाज येतो आणि गोंधळ ऐकून आजूबाजूचे लोक जमा झाले. दरम्यान नातेवाईकांनीही या प्रकरणी जाब विचारल्यावर प्रेयसीनं उलट उत्तरं देण्यास सुरू केली. या प्रकऱणी पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी प्रेयसी आणि पतीला ताब्यात घेतलं आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Panipat

    पुढील बातम्या