मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

वारकऱ्यांची रांगेतून मुक्तता, आता विठुरायाचं टोकनद्वारे दर्शन !

वारकऱ्यांची रांगेतून मुक्तता, आता विठुरायाचं टोकनद्वारे दर्शन !

पंढरपुरात जाऊन विठ्ठलाच्या दर्शनासाठी तांसतास रांगे उभं राहाण्याची आता गरज नाहीये.

पंढरपुरात जाऊन विठ्ठलाच्या दर्शनासाठी तांसतास रांगे उभं राहाण्याची आता गरज नाहीये.

पंढरपुरात जाऊन विठ्ठलाच्या दर्शनासाठी तांसतास रांगे उभं राहाण्याची आता गरज नाहीये.

सुनिल उंबरे,पंढरपूर

24 एप्रिल : येत्या आषाढी यात्रेपूर्वी पंढरपुरातील वारकऱ्यांना रांगेशिवाय थेट विठ्ठलाचं दर्शन घेता येणार आहे. आज झालेल्या मंदिर समितीच्या बैठकीत टोकनने दर्शन देण्याचा  निर्णय घेण्यात आलाय. न्यूज18 लोकमतच्या बातमीनंतर मंदिर समितीनं हा निर्णय घेतलाय. शिवाय विठ्ठल मंदिरातील शॉर्टकट दर्शन घडवणाऱ्या दलालांवरही कारवाई केली जाणार आहे.

पंढरपुरात जाऊन विठ्ठलाच्या दर्शनासाठी तांसतास रांगे उभं राहाण्याची आता गरज नाहीये. कारण तिरुपती बालाजी आणि शिर्डी देवस्थानच्या धर्तीवर भाविकांना टोकन देऊन दर्शनाची व्यवस्था करण्याचा महत्वाचा निर्णय पंढरपूर मंदिर समितीच्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे वारकऱ्यांची दर्शन रांगेतून मुक्ती होणार आहे.

दर्शन रांगेमुळे भाविकांना त्रास होतोच...शिवाय सुलभ दर्शनासाठी दलालांची साखळी कशी निर्माण झाली हे न्यूज18 लोकमतनं स्टिंग ऑपरेशनमधून समोर आणलं. त्याची गंभीर दखल घेत मंदिर प्रशासनानं दर्शनासाठी टोकणची व्यवस्था करण्याचा निर्णय घेतलाय. शिवाय दोषी 7 कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचंही सांगितलंय.

शेकडो किलोमीटरची पायपीट करून 24-24 तास दर्शन रांगेत उभ्या राहाणाऱ्या वारकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल अशी आशा आहे.

First published:

Tags: Pandharpur, Vitthal, टोकन, पंढरपूर, विठ्ठल