• Home
 • »
 • News
 • »
 • news
 • »
 • बाळूमामा यांच्या वारसावरुन नवा वाद; ग्रामपंचायतीने केला हा ठराव

बाळूमामा यांच्या वारसावरुन नवा वाद; ग्रामपंचायतीने केला हा ठराव

या प्रकरणात मनोहर मामा यांनीही स्पष्टीकरण दिलं आहे.

 • Share this:
  पंढरपूर, 27 ऑगस्ट : कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur News) आदमापुर येथील ग्रामपंचायतीने करमाळ्यातील मनोहर मामा यांच्या बद्दल एक पत्र काढल्यानंतर बाळूमामा यांच्या वारसावरून वाद निर्माण झाला आहे. 'आपण बाळूमामाचे (Balu mama) भक्त आहोत, बाळूमामाची उपासना करतो पण आजपर्यंत कधीही बाळूमामांचे वंशज अथवा त्यांचा अवतार आहे असं वक्तव्य कुठेही केलेले नाही तसेच श्रीक्षेत्र उंदरगाव येथील मठातून भक्तांची कुठलीही आर्थिक लूट केली जात नाही', असे स्पष्टीकरण मनोहर मामा यांनी दिलेल आहे. ( New  controversy over Balumamas heritance) कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर हे संत बाळूमामाचे मूळ स्थान आहे. येथील ग्रामपंचायतीने करमाळा तालुक्यातील उंदरगाव येथील बाळुमामाचे भक्त मनोहर मामा हे संत बाळूमामा यांच्या नावाचा वापर करून भक्तांकडून आर्थिक देणगी घेत असल्याचा आरोप आदमापूर ग्रामपंचायतीचे सरपंच विजय गुरव यांनी केला आहे. यावर ग्रामपंचायतीने तसा ठराव देखील केला आहे. ग्रामपंचायतीच्या ठरावानंतर आदमापुर येथील बाळूमामाचे भक्त आणि करमाळा तालुक्यातील उंदरगाव येथील मनोहर मामा यांच्यामध्ये वाद निर्माण झाला आहे. हे ही वाचा-बाबा तुम्ही माझ्या मृत्यूचा बदला घ्या’ Suicide Note लिहून तरुणीची आत्महत्या त्यावर उंदरगाव येथील बाळुमामाचे भक्त मनोहर मामा यांनी आपण बाळूमामाचा वारसदार किंवा शिष्य नसून केवळ भक्त म्हणून सेवा करत आहे. उंदरगाव येथे माझ्या स्वतःच्या शेतात बाळूमामाचे मंदिर उभे केले आहे. येथे दर्शनासाठी राज्यभरातून अनेक भाविक येतात, केवळ मंदिर आहे म्हणून माझा आणि आदमापुर येथील बाळूमामा संस्थांचा किंवा मंदिराशी कोणताही संबंध नसल्याचेही मनोहर मामा यांनी यावेळी स्पष्ट केले.
  Published by:Meenal Gangurde
  First published: