कालच्या हिंसाचारानंतर हरियाणातील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर

कालच्या हिंसाचारानंतर हरियाणातील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर

पंचकुलातल्या कालच्या हिंसाचारानंतर आज तिथलं जनजीवन हळूहळ पूर्वपदावर येतंय. सकाळपासून पंचकुलातील नागरिक घराबाहेर पडल्याचं चित्र होतं.

  • Share this:

पंचकुला, 26 ऑगस्ट : पंचकुलातल्या कालच्या हिंसाचारानंतर आज तिथलं जनजीवन हळूहळ पूर्वपदावर येतंय. सकाळपासून पंचकुलातील नागरिक घराबाहेर पडल्याचं चित्र होतं. काल झालेल्या हिंसाचाराच्या खुणा पंचकुलात ठिकठिकाणी दिसत होत्या. गेल्या आठवडाभरापासून पंचकुलातील स्थिती तणावपूर्ण होती. पण हरियाणा सरकारनं कोणतीही उपाययोजना केली नाही.

सैन्यामुळे पंतकुलातील स्थिती नियंत्रणात आल्याचं स्थानिक सांगतात. स्थानिकांनी लष्कराच्या जवानांना धन्यवाद दिलेत. दरम्यान खबरदारी म्हणून पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी सुरू केलीये. सध्या हरियाणात तणावपूर्ण शांतता आहे.

साध्वी बलात्कार प्रकरणी डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बाबा गुरूमीत राम रहीमला विशेष सीबीआय न्यायालयाने काल दोषी ठरवल्यानंतर तिथं हिंसाचाराचा भडका उडाला होता. पोलीस आणि बाबा रहीमच्या समर्थकांमध्ये ठिकठिकाणी झालेल्या धुमश्चक्रीत 32 जण ठार तर 250जण जखमी झालेत. रेल्वेसह शासकीय मालमत्तेचंही अतोनात नुकसान झालंय. हरियाणातल्या खट्टर सरकारने बघ्याची भूमिका घेतल्यानेच उत्तर भारतात एवठ्या मोठ्या प्रमाणावर बाबा समर्थकांनी उत्पात घडवून आणल्याचा आरोप होतोय.

First published: August 26, 2017, 11:06 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading