Palghar ZP Election Result: भाजपला एका दिवसात दुसरा धक्का, नागपूरनंतर पालघरही गेलं

Palghar ZP Election Result: भाजपला एका दिवसात दुसरा धक्का, नागपूरनंतर पालघरही गेलं

पालघर जिल्हा परिषदेच्या 57 जागांसाठी 229 उमेदवार आहेत. तर आठ तालुक्यांतील पंचायत समितीच्या 114 जागांसाठी 434 उमेदवार नशिब आजमावत आहेत.

  • Share this:

पालघर, 08 जानेवारी : राज्यातील पालघर, नागपूर, धुळे, नंदुरबार, अकोला आणि वाशिम या 6 जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचे निकाल (ZP election results ) आज जाहीर होत आहेत. या 6 जिल्ह्यांमध्ये काल मतदान पार पडलं त्यानंतर आज सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणी सुरू आहे. सर्वच जिल्हा परिषदांमध्ये (ZP Election Results ) आजी-माजी मंत्र्यांसह, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. पालघर जिल्ह्यात शिवसेनेची मुसंडी पाहायला मिळत आहे. सर्वाधिक 18 जागांवर शिवसेना विजयी झाली आहे. पालघरमध्ये भाजपला अवघ्या 10 जागांवर समाधान मानावं लागलं तर राष्ट्रवादीने तब्बल 15 जागांवर बाजी मारली आहे.

पालघरमध्ये सेना-भाजप-काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशी तिहेरी रंगत पाहायला मिळत आहे. पालघर जिल्हा परिषदेच्या 57 जागांसाठी 229 उमेदवार आहेत. तर आठ तालुक्यांतील पंचायत समितीच्या 114 जागांसाठी 434 उमेदवार नशिब आजमावत आहेत. पालघर जिल्ह्यात शिवसेना आणि भाजप स्वतंत्र लढत आहेत. तर काँग्रेस, राष्ट्रवादी, माकप आणि बहुजन विकास आघाडी हे ‘महाआघाडी’ करुन लढा देत आहेत.

पालघरमध्ये जव्हार पंचायत समितीवर भाजपला आपली सत्ता कायम ठेवण्यात यश आल असून आठ पैकी भाजपच्या चार शिवसेनेच्या तीन आणि माकपाची एक जागा निवडून आली आहे. तर तालुक्यात भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी आणि माकपा या प्रत्येकी पक्षाला जिल्हा परिषदेच्या एक-एक जागा राखण्यात यश आलं आहे.

पालघर जिल्हा परिषदेतील 41 जागांवरील निकाल -

एकूण जागा : 57

निकाल जाहीर : 57

शिवसेना : 18

माकपा: 6

भाजप : 10

राष्ट्रवादी : 15

बविआ: 04

मनसे:0

अपक्ष : 03

काँग्रेस : 1

इतर बातम्या - Osmanabad ZP Election Result: शिवसेनेच्या 'तानाजीं'ची बंडखोरी, भाजपला दिली साथ

पालघरमध्ये महाविकास आघाडी नाही!

पालघर जिल्हा परिषद निवडणुकीत दणक्यात मतदान पार पडलं. पालघर जिल्हा परिषद निवणुकीसाठी 1312 मतदान केंद्रावर मतदान झालं असून यासाठी 7221 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. या निवडणुकीसाठी ईव्हीएम यंत्राचा वापर करण्यात आला. 1312 मतदान केंद्रासाठी 1850 ईव्हीएम मशीन वितरित करण्यात आल्या होत्या. पालघर जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतदारांची संख्या दहा लाख 44 हजार 288 असून त्यात पाच लाख तीस हजार 621 पुरुष मतदार, पाच लाख 14228 महिला आणि 39 इतर मतदार आहेत.

राज्यात महाविकास आघाडी असली तरी पालघर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये सर्वच राजकीय पक्ष एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. पालघर जिल्हा परिषदेच्या 57 जागांसाठी 213 उमेदवार रिंगणात आहेत.

Published by: Renuka Dhaybar
First published: January 8, 2020, 3:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading