पालघरमधील वाडा इथं शेतकऱ्यांसाठी विशेष सेंद्रीय शेती शिबिराचं आयोजन

वाडा तालुक्यातील असनस गावात 'नमस्कार नागो फाउंडेशन'च्या वतीने शेतकरी बांधवांसाठी गेल्या रविवारी सेंद्रीय शेती आणि भाजीपाला प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आले होते. यावेळी कृषिकेंद्र प्रशिक्षक संदीप कांबळे यांनी शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीबाबत बहुमोल मार्गदर्शन केलं.

Chandrakant Funde | Updated On: Nov 20, 2017 05:06 PM IST

पालघरमधील वाडा इथं शेतकऱ्यांसाठी विशेष सेंद्रीय शेती शिबिराचं आयोजन

20 नोव्हेंबर, पालघर : वाडा तालुक्यातील असनस गावात 'नमस्कार नागो फाउंडेशन'च्या वतीने शेतकरी बांधवांसाठी गेल्या रविवारी सेंद्रीय शेती आणि भाजीपाला प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आले होते. यावेळी कृषिकेंद्र प्रशिक्षक संदीप कांबळे यांनी शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीबाबत बहुमोल मार्गदर्शन केलं. तर तालुका कृषी अधिकारी भरत वारे यांनी सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी शासन कोणकोणत्या योजना राबवतं याची सविस्तर माहिती दिली. ज्येष्ठ पत्रकार विजयकुमार बांदल आणि नागो फाऊंडेशनचे आयझॅक नागो हे देखील आवर्जून उपस्थित होते.

रासायनिक खतांमुळे जमिनीचा कस कसा कमी होतो, पिकांची कशी हानी होते. तसेच मानवीआरोग्याला कशी हानी पोहचते, याबाबत संदीप कांबळे यांनी सविस्तर माहिती दिली. तर संदीप कांबळे यांनी विविध प्रकारची सेंद्रीय खते कशी तयार करायची आणि ती कशी वापरायची याबाबत मार्गदर्शन केलं. शेतकऱ्यांना सेंद्रीय शेतीबाबत यापुढे गट प्रशिक्षणही देणार असल्याचं संस्थेच्यावतीने यावेळी स्पष्ट करण्यात आलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 20, 2017 05:06 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close