पालघर, 31 मे : पालघर लोकसभा पोडनिवडणुकीत भाजपने जिंकत शिवसेनेला दे धक्का दिलाय. शिवसेना आणि भाजपसाठी प्रतिष्ठेच्या असलेल्या निवडणुकीत मात्र काँग्रेसचा खुर्दा पडलाय. काँग्रेस पाचव्या स्थानावर फेकली गेलीये.
काँग्रेसचे नेते राजेंद्र गावित भाजपात दाखल झाले आणि पालघर निवडणुकीत विजयीही झाले. पण पालघरच्या निवडणुकीत काँग्रेसला दारूण पराभव झालाय. निकालाच्या मतमोजणीपासून काँग्रेस पिछाडीवर होती आणि शेवटही पिछाडीवरच झाला. काँग्रेस पाचव्या स्थानावर फेकली गेली. भाजपचे उमेदवार राजेंद्र गावितांना गावित यांना 272780 मतं तर शिवसेनेच्या श्रीनिवास वनगा यांना 243206 मतं मिळाली असून दुसऱ्या स्थानावर आहे. तर बहुजन विकास आघाडीचे उमेदवार बळीराम जाधव 222837 मतं मिळवून तिसऱ्या स्थानावर आहे. तर काँग्रेसचे दामू शिंगडा यांना 47713 मतं मिळाली आहे.
पालघरमध्ये झालेला पराभव हा काँग्रेसला आत्मचिंतन करणारा आहे.
पालघर लोकसभा पोटनिवडणुकीचा निकाल इथं पाहा
भाजपचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे पालघरमध्ये पोटनिवडणूक पार पडली. दिवंगत नेते चिंतामण वनगा यांचे पुत्र श्रीनिवास वनगा यांनी निवडणुकीआधी शिवसेनेत प्रवेश केला आणि शिवसेनेने त्यांना उमेदवारीही दिली. तर भाजपनं काँग्रेसमधून आलेले राजेंद्र गावित यांना उमेदवारी दिल्यानं ही निवडणूक सुरशीची बनली आहे. बहुजन विकास आघाडीने त्यांचे माजी खासदार बळीराम जाधव यांनाच पुन्हा उमेदवारी दिलीय. दामू शिंगडा हे काँग्रेसचे उमेदवार आहेत.
२००८ च्या फेररचनेत हा मतदार संघ तयार झाला. पालघर लोकसभा मतदार संघात सहा विधानसभा मतदार संघ येतात – डहाणू, विक्रमगड, पालघर, बोईसर, नालासोपारा आणि वसई. २८ मे रोजी इथं 51 टक्के मतदान झालंय.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा