भारताच्या टॉमेटोमुळे पाक मीडिया लालेलाल; रिपोर्टरचा 'तोबातोबा'वाला VIDEO व्हायरल

भारताच्या टॉमेटोमुळे पाक मीडिया लालेलाल; रिपोर्टरचा 'तोबातोबा'वाला VIDEO व्हायरल

भारताच्या टॉमेटोमुळे लालेलाल झालेला पाकच्या रिपोर्टरचा व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे.

  • Share this:

मुंबई, 24 फेब्रुवारी : पुलवामा हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानची कोंडी करायाल सुरूवात केली आहे. त्याचे परिणाम आता दिसून लागले आहे. त्यानंतर पाकिस्तानच्या महिला अँकरचा भारताला धमकी देणारा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. यामध्ये महिला अँकर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारताला धमकी देताना दिसत आहे.

भारतानं कडक पावलं उचलल्यानंतर सध्या पाकिस्तानमध्ये टॉमेटोचे दर 180 रूपये किलो झाले आहेत. त्यानंतर राजकारण्यांसह पाकिस्तानी मीडिया देखील लालेलाल झाली असून त्यांनी थेट आता भारताला अणुबॉम्ब हल्ल्याची धमकी दिली आहे. पाकिस्ताननं तयार केलेला अणुबॉम्ब हा शोभेसाठी नसून भारताविरोधात वापरण्यासाठी आहे. शिवाय, हा न्यूज रिपोर्टरचा सतत तोबातोबा म्हणत असून कान पकडत असल्याचं दिसत आहे.

ऐवढ्यावरच न थांबता पाकिस्तान आता स्वत: टॉमेटोची शेती करेल असा थेट इशाराच जणू या न्यूज रिपोर्टरनं दिला आहे.

">

पाकिस्तानविरोधात भारताची कडक पावलं

पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यामध्ये 40 जवान शहीद झाले. त्यानंतर भारतानं पाकिस्तानचा मोस्ट फवर्ड नेशन हा दर्जा काढून घेतला. शिवाय, पाकिस्तानच्या वस्तुंवर देखील भारतानं 200 टक्के आयात शुल्क लावले आहेत. तर, भारतानं पाकिस्तानविरोधात संयुक्त राष्ट्र संघात देखील आवाज उठवला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील पाकची नाकेबंदी करण्यासाठी भारत प्रयत्नशील आहे.

पाणी रोखण्याचा निर्णय

मोदी सरकारनं आता रावी नदीवरील पाणी रोखण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी शाबपूर - कांडी याठिकाणी धरणाच्या कामाला सुरूवात देखील झाली आहे. या प्रोजेक्टला नॅशन प्रोजेक्ट म्हणून देखील घोषित करण्यात आलं आहे. मोदी सरकारनं रोखलेलं पाणी आता जम्मू - काश्मीर आणि पंजाबकडे वळवण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विटरवरून 21 फेब्रुवारी रोजी याबद्दलची माहिती दिली होती.

VIDEO: 'शहीद जवानांचा राजकीय बळी, अजित डोवालांची चौकशी करा'

First published: February 24, 2019, 4:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading