मित्रांसमोर नाचण्यासाठी पतीने केला हट्ट, नकार दिल्यामुळे पत्नीचं केलं मुंडण

मित्रांसमोर नाचण्यासाठी पतीने केला हट्ट, नकार दिल्यामुळे पत्नीचं केलं मुंडण

लाहोरच्या असमा अजीज यांच्या म्हणण्यानुसार, त्यांचे पती मियां फैसल याने त्यांना त्याच्या मित्रांसमोर नाचण्यासाठी सांगितलं. याला असमाने नकार दिल्यामुळे पतीने असमा यांचं मुंडण केलं आणि त्यांना निर्वस्त्र करत भर उन्हात रस्त्यावर मारहाण केली.

  • Share this:

पाकिस्तान, 31 मार्च : पाकिस्तानमध्ये एका महिलेसोबत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महिलेसोबत तिच्या पतीने गंभीर कृत्य केलं आहे. अखेर हा प्रकार महिलेनेच सगळ्यांसमोर आणला आहे. महिलेने त्याचा व्हिडिओ शूट करत तो सोशल मीडियावर शेअर केला आहे. आणि याची माहिती मित्रांनी दिली आहे.

लाहोरच्या असमा अजीज यांच्या म्हणण्यानुसार,  त्यांचे पती मियां फैसल याने त्यांना त्याच्या मित्रांसमोर नाचण्यासाठी सांगितलं. याला असमाने नकार दिल्यामुळे पतीने असमा यांचं मुंडण केलं आणि त्यांना निर्वस्त्र करत भर उन्हात रस्त्यावर मारहाण केली.

यासंदर्भात असमा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्यासाठी गेली असता, पोलिसांनी तिच्याकडून पैशांची मागणी केली त्यामुळे पोलिसांवरही गुन्हा दाखल करा अशी मागणी तिने केली आहे.

पण जेव्हा महिलेचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला तेव्हा पोलिसांनी असमाच्या पतीला आणि तिच्या मित्रांना ताब्यात घेतलं आहे. आणि त्यांच्याविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी महिलेच्या घरातून ट्रिमर जप्त केलं आहे. ज्याने असमाचे केस कापले. तर पाकिस्तानच्या मानवाधिकार मंत्री शिरीन माजरी यांनी प्रकरणात कारवाईचे आदेश दिले आहेत.

पाकिस्तानी मीडियानुसार, असमा आणि फैसलचं लग्न 4 वर्षांआधी झालं होतं. दोघांना 3 मुलं आहे. दरम्यान, असमाची वैदकीय चाचणी झाली असता तिला मारहाण केल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे पोलीस आता या प्रकरणाचा अधित तपास करत आहे.

VIDEO : आईचं डोकं जमिनीवर आपटून हत्या करणारा हैवान मुलगा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 31, 2019 10:40 AM IST

ताज्या बातम्या