भारताविरुद्ध खराब खेळण्याची शिक्षा भोगतोय हा पाकिस्तानी गोलंदाज

भारताविरुद्ध खराब खेळण्याची शिक्षा भोगतोय हा पाकिस्तानी गोलंदाज

आमिरला गेल्या पाच सामन्यांमध्ये एकही गडी बाद करता आला नाही. नेमकी हीच गोष्ट त्याच्याविरोधात गेली

  • Share this:

लाहौर, ०२ ऑक्टोबर २०१८- पाकिस्तानचा जलदगती गोलंदाज मोहम्मद आमिर एशिया कप २०१८ मध्ये सपशेल अपयशी ठरला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या आगामी कसोटी सामन्यात मोहम्मद आमिरला पाकिस्तानी संघातून वगळण्यात आलं आहे. २६ वर्षांचा आमिर आता स्थानिक क्रिकेट संघातून खेळणार आहे. आमिरला गेल्या पाच सामन्यांमध्ये एकही गडी बाद करता आला नाही. नेमकी हीच गोष्ट त्याच्याविरोधात गेली.

आता आमिर सुई सदर्न गॅस कॉरपोरेशन या संघातून खेळणार आहे. तो तीन वर्षांनंतर या संघातून खेळणार आहे. तो २०१५ मध्ये एसएसजीसी संघाकडून तीन सामने खेळला होता. आमिरला एशिया कप २०१८ मधील त्याच्या खराब कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतून वगळण्यात आले आहे.

एशिया कपमधील तीन सामन्यात आमिरने १८ ओवरमध्ये दोन मेडन ओवर जरूर टाकल्या. मात्र त्याला एकही गडी बाद करता आला नाही. याचा फटका संपूर्ण पाकिस्तान संघाला बसला. पाकिस्तानविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा पहिला कसोटी सामना ७ ऑक्टोबर पासून दुबईत सुरू होणार आहे. तर दुसरा कसोटी सामना अबु धाबीमध्ये १६ ऑक्टोबरला खेळण्यात येणार आहे. आमिरने पाकिस्तानसाठी ३३ कसोटी सामने, ४६ एकदिवसीय सामने आणि ४१ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे.

Video : आर्य चाणक्यांनी दिलेले हे ६ उपदेश ऐकाल तर यशस्वी व्हाल

First published: October 2, 2018, 2:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading