मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

भारतीय सीमेवर पाकिस्तानचा ड्रोनहल्ला, भारतीय जवानांचं सडेतोड उत्तर

भारतीय सीमेवर पाकिस्तानचा ड्रोनहल्ला, भारतीय जवानांचं सडेतोड उत्तर

Border Crisis : पंजाबमधील गुरदासपूर (Panjab Gurudaspur) येथील भारत पाकिस्तान सीमेवर (India-Pakistan Border) पाकिस्ताननं ड्रोनच्या (Drone) मदतीने भारतीय सीमेवर 11 हँडग्रेनेड (Hand Grenade) टाकले. भारतीय लष्कराने फायरिंग करत हा हल्ला परतवून लावला.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk
नवी दिल्ली, 21 डिसेंबर: भारतीय सीमेत (India Border) घुसखोरी (infiltration) करणाऱ्या काही पाकिस्तानी (Pakistan) नागरिकांना भारतीय जवानांनी कालच पकडले आहे. ही घटना ताजी असताना पाकिस्तानचा आणखी एक कारस्थान भारतीय जवानांनी (Indian Army) हाणून पाडलं आहे. पंजाबमधील गुरदासपूर (Panjab Gurudaspur) येथील भारत पाकिस्तान सीमेवर (India-Pakistan Border) हा प्रकार आढळून आला. भारतात दहशत पसरवण्याचा उद्देशानं पाकिस्ताननं ड्रोनच्या (Drone) मदतीने भारतीय सीमेवर 11 हँडग्रेनेड (Hand Grenade) टाकण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय सीमेवर जप्त करण्यात आलेले सर्व हॅन्ड ग्रेनेड्सची निर्मिती पाकिस्तानतील रावळपिंडी (Rawalpindi) येथील आयुध कारखान्यात केली गेली आहे. शनिवारी रात्री उशिरा चकरी सीमेवरील BSF च्या जवानांना भारतीय सीमेकडे एक ड्रोन येताना दिसले. हे ड्रोन पाकिस्तानातून भारतीय सीमेकडे येत होते. यानंतर बीएसएफ जवान सतर्क झाले आणि त्यांनी ड्रोन पाडण्यासाठी फायरिंग केली. हे ड्रोन पाडण्यात भारतीय जवानांना यश आलं नाही, पण हे ड्रोन पून्हा पाकिस्तानात परत गेलं. या घटनेनंतर पोलीस आणि बीएसएफच्या पथकानं रविवारी सकाळी स्लाच गावात शोधमोहीम राबवली. शोधमोहीम दरम्यान या गावाजवळ 11 हँड ग्रेनेड सापडले. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं की, या ग्रेनेडचा बॉक्स हा एका लाकडी चौकटीला नायलॉनच्या दोरीनं बांधला होता. तसेच या दोरीच्या मदतीनं ड्रोननं हे हॅंड ग्रेनेड जमीनीवर टाकले होते. 2008 साली मुंबई दहशतवादी हल्ल्यात याच जातीचे हॅंड ग्रेनेड वापरले होते. भारतीय सीमेवरून जप्त केलेले हे हँड ग्रेनेड्स आर्जे टाइप एचजी-84 या प्रकारातील आहेत. या ग्रेनेडची रेंज 30 मीटर पर्यंत असते. यासंबंधी अधिक माहिती अशी, की 2008 साली मुंबई दहशतवादी हल्ल्यात, 1993 सालच्या दहशतवादी हल्ल्यात आणि 2001 साली संसदेवर झालेल्या हल्ल्यात देखील अशाप्रकारचे हॅंड ग्रेनेड वापरले होते.
First published:

Tags: Jammu kashmir, Pakistan

पुढील बातम्या