300 लोकांना मारलं तर कुठंय त्यांचं रक्त?, 'AIR STRIKE' वर पाकिस्तानचा सवाल

300 लोकांना मारलं तर कुठंय त्यांचं रक्त?, 'AIR STRIKE' वर पाकिस्तानचा सवाल

'आम्ही याचं उत्तर देऊ, तुम्ही याची आता वाट बघा. आता आम्ही तुम्हाला छळणार. राष्ट्रीय कमान प्राधिकरण काय आहे हे तुम्हाला माहित असावं अशी आमची अपेक्षा आहे.'

  • Share this:

नवी दिल्ली, 26 फेब्रुवारी : भारताने हवाई हल्ला केल्यानंतर पाकिस्तानकडून वारंवार यावर प्रतिक्रिया दिल्या जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी सेनेच्या मीडिया विंग इंटर सर्विसेस पब्लिक रिलेशन(ISPR) कडून मंगळवारी पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये हल्ल्यात कोणीही दगावलं नसल्याचं पाकिस्तानने म्हटलं आहे.

या पत्रकार परिषदेमध्ये असं म्हणण्यात आलं आहे की, 'भारतीय वायुसेनेनं असा दावा केला आहे की, तब्बल 300 दहशतवादी मारले गेले. जर या हवाई हल्ल्यामध्ये 10 जण जरी मारले गेले असते तर तिथे त्यांचं रक्त नसतं का दिसलं? कोणावर अंत्यसंस्कार नसते का झाले? याची जर कोणाला खात्री करायची असेल तर त्यांचीसाठी घटनास्थळी खुलं आहे.' असंदेखील या पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं आहे.

ISPR चे डीजी पुढे म्हणाले की, 'भारत हल्ला करू शकत नाही. भारत फक्त चकमकी करू शकतं. तुम्ही आम्हाला कधीच इजा पोहचवू शकत नाही. आम्हीच तुम्हाला धक्का देऊ शकतो.'

सगळ्यात मोठी बातमी: पाहा, भारताने पाकिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्याच्या बातम्या विदेशी मीडियाने कशा दाखवल्या

गफूर म्हणाले की, 'आम्ही याचं उत्तर देऊ, तुम्ही याची आता वाट बघा. आता आम्ही तुम्हाला छळणार. राष्ट्रीय कमान प्राधिकरण काय आहे हे तुम्हाला माहित असावं अशी आमची अपेक्षा आहे. पंतप्रधानांनी पाकिस्तानच्या सैन्याला आणि लोकांना हल्ल्यासाठी तयार राहण्याचं सांगितलं आहे. भारत आता मोठ्या हल्ल्य़ासाठी तयार राहा.'

डीजी म्हणाले की, 'हल्ल्याबद्दल आम्ही खोटं बोलत नाही आहोत. आता आम्ही ठरवलं तर हल्ला करणारच आणि जगाला आमची ताकद दाखवून देऊ.'

असा झाला Air Srrike

पहाटे 3 वाजून 30 मिनिटांनी भारतीय वायु दलाच्या मिराज - 2000 या विमानांनी पाक व्याप्त काश्मीरमध्ये प्रवेश करत दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य केलं. यामध्ये 200 पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा केला. भारतीय वायु दलानं केलेल्या कारवाईमुळे दहशतवाद्यांना पळता भूई थोडी झाली. या हल्ल्यामध्ये 5 पाकिस्तानी सैनिक देखील ठार झाले. तर जखमींवर रूग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. 21 मिनिटं भारतीय हवाई दलानं केलेल्या बॉम्ब हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांच्या तळाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं.प्रत्युत्तरादाखल पाकनं भारतीय हवाई दलावर हल्ला केला. पण, भारतीय हवाई दलापुढे त्यांची डाळ शिजली नाही.

संबंधित बातम्या : AirStrikes करण्याआधी भारताने वापरले हे ड्रोन, पाकचे रडार झाले ठप्प

Air Strikeचा निर्णय मोदींचा

पाक व्याप्त काश्मीरमध्ये घुसून भारतीय हवाई दलानं केलेल्या कारवाईमध्ये 200 ते 300 दहशतवादी ठार झाल्याची माहिती सुत्रांनी दिली. दरम्यान, बालाकोट येथे Air strike करण्याचा निर्णय हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतल्याची माहिती न्यूज18च्या सुत्रांनी दिली. हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दहशतवाद्यांना माफी नाही असा इशारा दिला होता. त्यानंतर 15 दिवसामध्ये ही कारवाई करण्यात आली.

12 दिवसामध्ये मोदींचे पाकला सहा मोठे धक्के

- पुलवामा हल्ल्यामध्ये 100 जवान शहीद झाले. त्यानंतर केवळ 100 तासांच्या आतमध्ये भारतानं पुलवामा हल्ल्याचा मास्टर माईंड असलेल्या गाजी राशिद आणि कामरान खात्ना केला होता.

- पुलवामा हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानचा मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा काढून घेतला. त्यामुळे पाकिस्तानला व्यापारामध्ये दिलेली सूट बंद झाली.

- मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा काढल्यानंतर भारतानं पाकिस्तानी वस्तुंवर 200 टक्के कर लावला.

संबंधित बातम्या : सौगंध मुझे इस मिट्टी की, मैं देश नहीं मिटने दूँगा - मोदींची प्रतिक्रिया

- मोदी सरकारनं रावी नदीवरील पाणी रोखण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी शाबपूर - कांडी याठिकाणी धरणाच्या कामाला सुरूवात देखील झाली आहे. याप्रोजेक्टला नॅशन प्रोजेक्ट म्हणून देखील घोषित करण्यात आलं आहे. मोदी सरकारनं रोखलेलं पाणी आता जम्मू - काश्मीर आणि पंजाबकडे वळवण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विटरवरून याबद्दलची माहिती दिली.

- पुलवामा हल्ल्यानंतर भारताला अमेरिका, फ्रान्ससह इस्त्रायलनं देखील पाठिंबा दर्शवला. यानंतर भारतानं संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेमध्ये जैश ए मोहम्मदचा म्होरक्या अझर मसुदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याकरता प्रस्ताव मांडला. त्याला चीननं देखील पाठिंबा दर्शवला.

- दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारतीय वायू दलानं पाक व्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य केलं. यामध्ये 200 पेक्षा जास्त दहशतवादी ठार झाले.

VIDEO : जिथे झालं AIRSTRIKE तिथला दहशतवाद्यांच्या ट्रेनिंगचा व्हिडिओ व्हायरल

First published: February 26, 2019, 7:56 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading