‘भिकारी’ सर्च केल्यावर दिसतो इमरान खानचा फोटो, पाकिस्तानने गुगलकडे मागितलं उत्तर

या संदर्भात पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील विधानसभेत एक प्रस्ताव मांडण्यात आला आहे.

News18 Lokmat | Updated On: Dec 18, 2018 10:05 AM IST

‘भिकारी’ सर्च केल्यावर दिसतो इमरान खानचा फोटो, पाकिस्तानने गुगलकडे मागितलं उत्तर

कराची, १८ डिसेंबर २०१८- काही दिवसांपूर्वी गुगलवर ‘इडियट’ सर्च केल्यावर डोनाल्ड ट्रंपचा फोटो येत होता. यावर अमेरिकेच्या संसदेने गुगलचे सीईओ सुंदर पिचाईकडे विचारणा केली होती. आता असंच काहीसं प्रकरण पाकिस्तानातून आलं आहे. गुगलवर 'भिकारी' सर्च केल्यावर पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांचा फोटो समोर येत आहे.


या संदर्भात पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील विधानसभेत एक प्रस्ताव मांडण्यात आला आहे. यात गुगलचे सीईओ समन्स पाठवण्यात आला असून गुगलवर 'भिकारी' लिहिल्यावर इमरान खान यांचा फोटो का दिसतो याबद्दल त्यांच्याकडे उत्तरही मागितलं आहे. पाकिस्तानच्या एका पत्रकाराने इमरान खान आणि या प्रस्तावाचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
काही दिवसांपूर्वी गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांना अमेरिकेच्या संसदेत उभं रहावं लागलं होतं. यावेळी त्यांना गुगलवर 'इडियट' लिहिलं तर डोनाल्ड ट्रम्पचा फोटो का दिसतो या प्रश्नावर बाजू मांडायची होती.


याबद्दल स्पष्टीकरण देताना पिचाई म्हणाले की, गुगलचं सर्च इंजिन हे एल्गोरिदम आणि निकाल देण्यासाठी अनेक गोष्टींवर काम करतं. त्या नावाचे मिळत- जुळते विषय, प्रसिद्धी अशा विश्लेषणांनंतर सर्वोत्तम निर्णय दाखवला जातो.


पाकिस्तान आर्थिक संकटात अडकला आहे. यामुळे अर्थव्यवस्थेला चांगल्या पद्धतीने चालवण्यासाठी पाकिस्तान इतर देशांकडून कर्ज घेण्याचा प्रयत्न करत आहे. काही दिवसांपूर्वी इमरान खानने या मुद्यावरुनच अनेक देशांचे दौरे केले. यामुळेच सोशल मीडियावर त्यांच्या नावाचे अनेक मीम्स बनवले गेले.


VIDEO: शिवाजी महाराजांच्या वेषात संसदेत अवतरले 'हे' खासदार


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 18, 2018 10:05 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...