कृष्णा घाटीतलं बटालियन हेडक्वार्टर होतं पाकिस्तानच्या निशाण्यावर

कृष्णा घाटीतलं बटालियन हेडक्वार्टर होतं पाकिस्तानच्या निशाण्यावर

माहितीनुसार पाकिस्तानने पुरवठा आणि लष्कराच्या ठिकाणांवर लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला पण ते त्यात निष्फळ झाले. पाकिस्तानी वायुदलाने लष्कराच्या 4 ठिकाणांना लक्ष्य केलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 27 फेब्रुवारी : भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावपूर्ण वातावरण असतानाच एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानने कृष्णा घाटीमध्ये असलेल्या बटालियन मुख्यालयावर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला आहे. माहितीनुसार पाकिस्तानने पुरवठा आणि लष्कराच्या ठिकाणांवर लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला पण ते त्यात निष्फळ झाले. पाकिस्तानी वायुदलाने लष्कराच्या 4 ठिकाणांना लक्ष्य केलं आहे.

पाकिस्तानी लष्कराने बुधवारी दावा केला होता की, त्यांनी पाकिस्तानी एअर स्पेसमध्ये आलेल्या 2 भारतीय लढाई विमानांना मारलं आणि त्यातील एक वैमानिक हा त्यांच्या ताब्यात आहे. पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ता मेजर जनरल आसिफ गफूर यांनी ट्वीट करत दावा केला की एक विमान पाक व्याप्त काश्मीरमध्ये तर दुसरं विमान जम्मू काश्मीरमध्ये क्रॅश झालं.



आत्तापर्यंत काय काय झालं?

पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी भारताच्या जवानांच्या ताफ्यावर हल्ला केला. त्यात CRPFचे 40 जवान शहीद झाले. या दहशतवाद्यांना पाकिस्तानने आश्रय दिल्याचा भारताचा दावा होता आणि त्यानुसार पाकिस्तानवर कारवाईचा दबाव वाढवण्यात आला. 26 फेब्रुवारीला पहाटे भारतीय वायुसेनेने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून बालाकोट इथल्या जैश ए मोहम्मदच्या अतिरेकी तळांवर हल्ला केला आणि हे तळ उद्ध्वस्त केले. या कारवाईत 200 ते 300 अतिरेकी मारले असल्याचा भारताचा दावा आहे. यावर पाकिस्तानने हवाई हद्दीचं उल्लंघन केल्याचा बदला घेण्याची भाषा वापरली.

संबंधित बातम्या : जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी भारतात हल्ला करण्याच्या तयारीत - सूत्र

भारताची 2 विमानं पाडून एका वैमानिकाला अटक केली, पाकिस्तानचा दावा

' आम्ही भारताची 2 विमानं पाडून एका वैमानिकाला ताब्यात घेतलं आहे,' असा दावा पाकिस्तानने केला आहे. काही वेळापूर्वी भारताची दोन विमानं काश्मीरमध्ये कोसळली आहेत. ही विमानं आम्हीच पाडली आहेत, असा दावा पाकच्या लष्कराने केला.

भारताने पाकिस्तानचं F16 विमान पाडलं

भारताने पाकव्याप्त काश्मिरमध्ये केलेल्या एअर स्ट्राइकनंतर भारत- पाकिस्तानच्या एलओसीवर तणावाची परिस्थीती निर्माण झाली आहे. यात दर मिनिटाला नवीन अपडेट येत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय वायुसेनेने नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानचे फायटर जेट F16 पाडलं आहे. विमानातील सैनिक पॅराशूटमधून उतरताना दिसले. मात्र ते नक्की कोणत्या दिशेला गेले हे अजून कळू शकले नाही.

सीमेवर गोळीबार

गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घडामोडींमुळे काश्मिरातील वातावरण तापलं आहे. सीमेवर भारत आणि पाकिस्तानच्या सैन्यामध्ये सतत चकमकी सुरू आहेत. जम्मू-काश्मीरमधील शोपियाँमध्ये पाककडून गोळीबार करण्यात आला. त्याला भारतानेही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी भारताने पाकच्या 5 चौक्या उद्ध्वस्त केल्या तसंच पाकिस्तानचे काही सैनिकही मारले गेल्याची माहिती आहे. भारताने दहशतवाद्यांच्या तळावर हवाई हल्ला केल्यानंतर मंगळवारी संध्याकाळपासून पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात येत आहे. त्यानंतर भारतानेही चांगलंच प्रत्युत्तर दिलं आहे.

संबंधित बातम्या : भारताला नाही तर रावळपिंडीला करा टार्गेट, पाकिस्तानी पत्रकाराचा इम्रान खान यांना सल्ला

देशभरात हाय अॅलर्ट

उत्तर भारतातील अनेक महत्त्वाच्या ठिकाणांना हाय- अलर्ट देण्यात आले. तसेच काश्मीर आणि श्रीनगरचे विमानतळ प्रवाशी विमानांसाठी काही काळासाठी पूर्ण बंद ठेवण्यात आली आहेत. जम्मू, श्रीनगर, लेहकडे जाणाऱ्या प्रवाशी विमानांना मूळ शहरांकडे परत पाठवण्यात आले आहे.

पाकिस्तानला युद्धाची खुमखुमी

भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानने बुधवारी आक्रमक भूमिका घेतली. पाकिस्तानात सरकारविरोधात निर्माण झालेला क्षोभ कमी करण्यासाठी पाकिस्तानानी लढाऊ विमानांनी भारतीय हवाई सीमांचं उल्लंघन केल्याचा दावा पाकिस्तानने केला. तर युद्धाची परिस्थिती निर्माण झाली तर काय करता येईल यासाठी पाकिस्तानने देशातल्या तेलाच्या साठ्याचा आढावा घेण्याला सुरूवात केली आहे.

पाकिस्तानच्या ऊर्जा मंत्रालयाने देशातल्या तेल कंन्यांच्या प्रमुखांची तातडीची बैठक बोलावली आहे. आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली तर तेलाचे किती साठे उपलब्ध आहेत याचा आढावा घेण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली आहे.

भारत आणि पाकिस्तानदरम्यान युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली असून भारताकडून हल्ल्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत लष्कराला पेट्रोलियम पदार्थांचा पुरवठा कायम राहावा यासाठी काय करता येईल याचा आढावा या बैठकीत घेण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या : ...म्हणून जगातल्या सगळ्यात वाईट वायुदलांमध्ये आहे पाकिस्तान एअरफोर्स

भारतातली 6 विमानतळं काही काळ बंद आणि नंतर सुरू

उत्तर भारतातील अनेक महत्त्वाच्या ठिकाणी हाय- अलर्ट जारी करण्यात आला आहे. प्रवासी विमान सेवा बंद आहेत. इंडिगो, गो एअर कंपनीची विमानं पुन्हा दिल्ली विमानतळावर पाठवण्यात आली. अमृतसर, चंदिगड, लेह, जम्मू, श्रीनगर, देहरादून, धरमशाला आणि पठाणकोट विमानतळांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच अनेक व्यावसायिक कंपन्यांच्या विमानांना उड्डाण भरण्यास मनाई करण्यात आली आहे.

Army 'इन अॅक्शन', पहाटे दोन दहशतवाद्यांचा खात्मा

शोपियानमध्ये भारतीय लष्कराने दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. शोपियानमध्ये पहाटे दहशतवादी आणि लष्करामध्ये बराच वेळ चकमक सुरू होती. या चकमकीत लष्कराने दोन जवानांना कंठस्नान घातलं आहे.


VIDEO: 'पाकिस्तानला शांततेची नव्हे, शक्तीचीच भाषा कळते'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 27, 2019 07:03 PM IST

ताज्या बातम्या