News18 Lokmat

चीनला गेलेल्या इमरान खानचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल, लोकांनी घेतला क्लास

इमरान खान यांच्या लाईव्ह भाषणा दरम्यान स्क्रिनवर ‘बिजिंग’ लिहिण्याऐवजी ‘बेगिंग’ (भिक मागणं) असा शब्द लिहिला

News18 Lokmat | Updated On: Nov 7, 2018 01:19 PM IST

चीनला गेलेल्या इमरान खानचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल, लोकांनी घेतला क्लास

नवी दिल्ली, ७ नोव्हेंबर- सध्या पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांना अनेक संकटांना सामोरं जावं लागत आहे. पाकिस्तानसाठी आर्थिक मदत गोळा करण्यासाठी सध्या ते चीनच्या दौऱ्यावर आहेत. त्यांचा हा पहिला चीनचा दौरा वेगळ्याच कारणामुळे चर्चेचा विषय बनत आहे.Loading...


पाकिस्तानची सरकारी वाहिनी पी टीव्हीने इमरान खान यांच्या लाईव्ह भाषणा दरम्यान स्क्रिनवर ‘बिजिंग’ लिहिण्याऐवजी ‘बेगिंग’ (भिक मागणं) असा शब्द लिहिला. या शब्दामुळे अनेकांनी सोशल मीडियावर ट्रोल केलं.
आता चीनमधील एका प्रदर्शनाला दिलेल्या भेटीत इमरान खानचा एक फोटो काढण्यात आला. हाच फोटो सध्या सोशल मीडियावर कमालीचा ट्रोल होत आहे.
शांघाय येथे आयोजित केलेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय इम्पोर्ट एक्स्पोमध्ये इमरान गेले होते. पाकिस्तानच्या सरकारने त्यांच्या अधिकृत ट्विटरवरून या एक्स्पोचे फोटो ट्विट केले. या फोटोत इमरान एका व्हिडिओ गेम पार्लरमध्ये स्पेसशिपसारख्या दिसणाऱ्या मशीनवर बसले आहेत. इमरान यांच्यासोबत पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी आणि इतर वरिष्ठ अधिकारी उभे होते.
इमरान यांच्या या फोटोवरून अनेक पाकिस्तानी आपल्या पंतप्रधानांना ट्रोल करत आहेत. काशिफ नावाच्या एका व्यक्तीने ट्विट करत म्हटले की, ‘जेव्हा तुमच्या घरी नवीन कॉम्प्युटर येतो.’
दुसऱ्या एका व्यक्तीने लिहिले की, ‘असं वाटतंय की इमरान व्हिडिओ गेम खेळत आहेत आणि दुसरे त्यांची वेळ येण्याची वाट पाहत आहेत.’

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 7, 2018 01:19 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...