मलालावर गोळ्या झाडणारा तालिबानी दहशतवादी तुरुंगातून पळाला, Audio Clip मधून स्वत:च दिली माहिती

मलालावर गोळ्या झाडणारा तालिबानी दहशतवादी तुरुंगातून पळाला, Audio Clip मधून स्वत:च दिली माहिती

गुरुवारी सोशल मीडियावर शेअर केलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये एहसानने सांगितले की, 11 जानेवारीला तो पाकिस्तानी सुरक्षा एजन्सींच्या तुरूंगातून पळून गेला होता.

  • Share this:

नवी दिल्ली, 07 फेब्रुवारी : 2012 मध्ये पाकिस्तानमधील मलाला यूसुफजईवर झालेल्या हल्ल्या आणि 2014मध्ये पेशावरमधील लष्करी शाळेत झालेल्या प्राणघातक हल्ल्यासाठी जबाबदार असलेला पाकिस्तानमधील तालिबानचा माजी प्रवक्ता एहसान-उल्ला-एहसान हा तुरूंगातून पळून गेला आहे. एहसानने स्वतः ऑडिओ क्लिप व्हायरल करून याची माहिती दिली आहे. गुरुवारी सोशल मीडियावर शेअर केलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये एहसानने सांगितले की, 11 जानेवारीला तो पाकिस्तानी सुरक्षा एजन्सींच्या तुरूंगातून पळून गेला होता.

एहसानने असा दावा केला की, पाकिस्तानी सैन्य 2017 मध्ये मला दिलेले आश्वासन पाळण्यात अयशस्वी ठरले. क्लिपमध्ये तो बोलतो की, "अल्लाच्या मदतीने मी 1 जानेवारी 2020 रोजी सुरक्षा दलाच्या तुरूंगातून पळून जायला यशस्वी झालो." जर ती क्लिप विश्वासार्ह ठरली तर ती तालिबान निर्मूलनासाठी मोहीम राबवणाऱ्या पाकिस्तानला मोठा धक्का ठरणार आहे.

इतर बातम्या - उमर खालिद आणि योगेंद्र यादव यांच्या सभांना परवानगी नाकारली

एहसानने सध्या कुठे आहे याबद्दल त्याने काहीच माहिती दिली नसून मी तरुंगात ताढलेले दिवस आणि भविष्यात काय करणार आहे याबद्दल सविस्तर सांगेण असं त्याने म्हटलं आहे. महत्त्वाचे म्हणजे, सर्वात तरुण नोबेल शांती पुरस्कार विजेती मलालाला पाकिस्तानच्या स्वात खोऱ्यात 2012च्या महिला शिक्षण अभियानादरम्यान बंदुकीच्या गोळ्या घालून ठार मारण्यात आले होते. त्याच वेळी, 16 डिसेंबर 2014 रोजी पेशावरमधील आर्मी स्कूलवर झालेल्या हल्ल्यात 132 विद्यार्थ्यांसह 149 जण ठार झाले होते. या हल्ल्यात एहसानचा देखील सहभाग होता.

First published: February 7, 2020, 7:51 AM IST

ताज्या बातम्या