पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांचा आणखी एक खोटा व्हिडिओ रिलीज केला !

पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांचा आणखी एक खोटा व्हिडिओ रिलीज केला !

पाकिस्तानने भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांचा आणखी एक बनावट व्हिडिओ रिलीज केलाय. त्यात कुलभूषण जाधव यांनी आपल्याला पाकिस्तान सरकारकडून कोणताही त्रास होत नसल्याचा दावा केलाय. या व्हिडीओत कुलभूषण जाधव आपली आई आणि पत्नी भेटायला आली तेव्हा भारतीय अधिकारी जे. पी. सिंग हे त्यांच्यावर ओरडत होते, असा दावा करताना दिसत आहेत.

  • Share this:

04 जानेवारी, नवी दिल्ली : पाकिस्तानने भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांचा आणखी एक बनावट व्हिडिओ रिलीज केलाय. त्यात कुलभूषण जाधव यांनी आपल्याला पाकिस्तान सरकारकडून कोणताही त्रास होत नसल्याचा दावा केलाय. एवढंच नाहीतर या व्हिडीओत कुलभूषण जाधव आपली आई आणि पत्नी भेटायला आली तेव्हा भारतीय अधिकारी जे. पी. सिंग हे त्यांच्यावर ओरडत होते, असा दावा करताना दिसत आहेत.

या बनावट व्हिडिओमध्ये कुलभूषण जाधव पुढे म्हणतात, 'भेटीदरम्यान माझ्या आईला मारहाण करुन आणण्यात आलं असं वाटत होतं'. आपण आपल्या आईच्या डोळ्यात भीती पाहिल्याचं कुलभूषण जाधव व्हिडीओत सांगत आहेत. तसंच आपण गुप्तहेर खात्यात काम करत नव्हतो अशी खोटी माहिती भारत का देत आहे ? असा प्रश्नही ते विचारत आहेत. 'मला भारताला सांगायचं आहे की, मी भारतीय नौदलातील अधिकारी आहे. तुम्ही माझ्याबद्दल पाकिस्तानला खोटी माहिती का देत आहात ?', असं कुलभूषण जाधव बोलताना दिसत आहेत.

कुलभूषण जाधव यांना पाकिस्तान कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावलीय. त्याविरोधात भारत सरकार आंतरराष्ट्रीय हेग न्यायालयात गेलंय. त्यामुळेच भारताची बाजू कमकुवत करण्यासाठी पाकिस्तान जाणिवपूर्वकपणे कुलभूषण जाधव यांचा छळ करून त्यांच्याकडून भारताची बदनामी करणारी वक्तव्य वदवून घेत आहे. पाकिस्तानच्या या कृत्याचा भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने तीव्र शब्दात निषेध केलाय.

First published: January 4, 2018, 4:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading