मोदींचं नाव घेताच बसला शॉक, पाहा पाकिस्तानच्या 'आयटम' मंत्र्याचा व्हायरल VIDEO

मोदींचं नाव घेताच बसला शॉक, पाहा पाकिस्तानच्या 'आयटम' मंत्र्याचा व्हायरल VIDEO

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव घेताच रेल्वेमंत्री शेख रशीद यांना झटका बसतो. मोदींचं नाव घेताच त्यांना करंट बसल्याचा एक व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 31 ऑगस्ट : पाकिस्तानचे रेल्वेमंत्री शेख रशीद (शेख रशीद) हे त्यांच्या धाडसीपणामुळे जगभरात प्रसिद्ध आहेत. याआधीही त्यांनी कारनाम्यांमुळे पाकिस्तानला तोंडधशी पाडलं होतं. त्यामुळे केवळ पाकिस्तानच नाही तर संपूर्ण जगभरातून त्यांच्यावर टीका केली जाते. शेख रशीदच्या कारस्थानाची चर्चा पाकिस्तानच्या सोशल मीडियामध्येही होते. त्यांच्या अशा वागण्यामुळे पाकिस्तानची मान शर्मेने खाली गेली अशा सध्या चर्चा आहेत. त्यांनी हल्लीच असा काही प्रताप केला त्यांच्यावर टीकेचा भडीमार सुरू आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव घेताच रेल्वेमंत्री शेख रशीद यांना झटका बसतो. मोदींचं नाव घेताच त्यांना करंट बसल्याचा एक व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यांचा या व्हिडिओ मीडियावर चांगलाच गाजतोय. खरंतर शेख रशीद शुक्रवारी पाकिस्तानमधील एका जाहीर सभेत भाषण देत होते. माइक हातात घेऊन ते म्हणाले- 'मोदीजी, आम्हाला तुमच्या प्लानविषयी माहिती आहे'. धक्कादायक म्हणजे हे बोलताच त्यांनी विद्यूत करंट लागल्यासारखं शरीर झटकलं. त्यावर 'मोदींचं नाव घेताच करंट लागला' असंही ते म्हणाले.

यानंतर शेख रशीद म्हणाले की, 'मला करंट आला. पण काही हरकत नाही. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. स्वत: पाकिस्तानचे लोक शेख रशीद यांची खिल्ली उडवत आहेत. हा व्हिडिओ अनेकांनी ट्विटरवर शेअर केला आहे आणि त्यावर लिहिलं की, 'आता पाकिस्तानदेखील या मूर्ख माणसाला सहन करू शकत नाही.'

इतर बातम्या - 11 महिन्याच्या चिमुकलीवर उपचार करण्यासाठी आईची भन्नाट आयडिया, आधी बाहुलीला बांधलं प्लास्टर!

शेख रशीद यांनी अण्वस्त्र हल्ला करण्याची दिली होती धमकी

पाकिस्तानच्या शेख रशीद यांनी अलीकडेच भारत आणि पाकिस्तान यांच्यात अणुयुद्ध होण्याची धमकी दिली होती. ते म्हणाले की, 'भारत आणि पाकिस्तान यांच्यात ऑक्टोबरच्या शेवटी आणि नोव्हेंबर-डिसेंबर दरम्यान युद्ध होईल. अण्वस्त्र युद्धाचे नाव न घेता ते म्हणाले की आम्ही ही शस्त्रे दिवाळी साजरी करण्यासाठी ठेवली नाहीत. जर पाकिस्तानच्या जीवन मरणाचा प्रश्न असेल तर आम्ही भारतावर हल्ला करू.' शेख रशीद यांच्या या विधानावर कडक टीका करण्यात आली होती.

इतर बातम्या - उद्यापासून पैसे काढण्याचे नवे नियम, जाणून घ्या याबद्दल

लंडनमध्ये रशीद यांची बेदम धुलाई करण्यात आली होती...

रशीद यांच्या या मुर्खपणामुळे त्यांना अनेक वेळा मारहाणही करण्यात आली आहे. त्याला लंडनमध्ये मारहाण झाली होती तर त्यांच्यावर अंडी फेकण्यात आली होती. एका पुरस्कार वितरण समारंभासाठी ते लंडनमधील एका हॉटेलमध्ये गेले होते. तिथे शेख राशिद यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. काहींनी त्यांना घेरले आणि मारहाण केली. त्यावेळी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहण्यात आलं, त्यांच्यावर अंडी फोडण्यात आली. पण, सुदैवाने ते तिथून निसटले.

मुंबईतील 'नो पार्किंग' झोनची मनसेकडून पोलखोल, पाहा SPECIAL REPORT

Published by: Renuka Dhaybar
First published: August 31, 2019, 4:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading