ट्विटरवरून इम्रान खान यांनी दिल्या होळीच्या शुभेच्छा, भारतीयांच्या त्यावर भन्नाट प्रतिक्रिया

ट्विटरवरून इम्रान खान यांनी दिल्या होळीच्या शुभेच्छा, भारतीयांच्या त्यावर भन्नाट प्रतिक्रिया

इम्रान खान यांनी हिंदूंना शुभेच्छा देत ट्वीट केलं आहे. त्यात ते म्हणाले की, 'आपल्या हिंदू समाजातील लोकांना रंगाच्या या सणाच्या शुभेच्छा.'

  • Share this:

नवी दिल्ली, 20 मार्च : सध्या देशभर होळीचा उत्साह आहे. याच मुहुर्तावर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून हिंदूंना शुभेच्छा दिल्या आहेत. पण त्याला अकदी मजेशीर पद्धतीने लोकांनी उत्तर दिलं आहे. गेल्या काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचं वातावरण आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी इम्रान खान यांच्या शुभेच्छांना ट्रोल केलं आहे.

इम्रान खान यांनी हिंदूंना शुभेच्छा देत ट्वीट केलं आहे. त्यात ते म्हणाले की, 'आपल्या हिंदू समाजातील लोकांना रंगाच्या या सणाच्या शुभेच्छा.'

इम्रान खान यांच्या या ट्वीटवर 'द एक्सीडेंटल प्राईम मिनिस्टर'चे सहनिर्माता अशोक पंडित यांनी ट्वीट केलं आहे. त्यात ते म्हणाले की, 'आधी आमच्या सैनिकांसोबत रक्ताची होळी खेळण्याचं बंद करा आणि मग त्यांना होळीच्या शुभेच्छा द्या.'

त्यानंतर यावर अनेक लोकांनी ट्वीट केलं आहे.

First published: March 20, 2019, 8:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading