Elec-widget

2 महिन्यांची शिक्षा 36 वर्षांचा तुरुंगवास, गजानंद शर्मांची पाकच्या जेलमधून लवकरच सुटका

2 महिन्यांची शिक्षा 36 वर्षांचा तुरुंगवास, गजानंद शर्मांची पाकच्या जेलमधून लवकरच सुटका

शर्मा हे जयपूर येथील फतेह राम येथील टीबी नाहरगड येथील रहिवासी आहे. 1982 पासून शर्मा हे अचानक बेपत्ता झाले होते.

  • Share this:

नवी दिल्ली, 13 आॅगस्ट : पाकिस्तान आपल्या जेलमध्ये कैद असलेल्या 30 भारतीय कैद्यांची सुटका करत आहे. यात तीस कैद्यांमध्ये राजस्थान येथील राहणारे गजानंद शर्मा यांचा समावेश आहे. गजानंद शर्मा यांना 2 महिन्याची शिक्षा सुनावली होती पण काऊंसलर एक्सेस नसल्यामुळे त्यांना 36 वर्ष जेलमध्येच ठेवण्यात आलं होतं. अखेर 36 वर्षांची शिक्षा भोगल्यानंतर शर्मा अखेर जेलबाहेर येणार आहे.

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितलंय की, पाकिस्तान सरकार 14 आॅगस्ट स्वातंत्र्य दिनी 30 कैद्यांना सोडणार आहे. यात 27 मच्छिमारांचा समावेश आहे. आम्ही कधीच मानवीय नियमांचं राजकारण करू इच्छित नाही.

गजानंद शर्मा यांना लाहोर येथील लखपत कारागृहात ठेवण्यात आलं होतं. शर्मा हे जयपूर येथील फतेह राम येथील टीबी नाहरगड येथील रहिवासी आहे. 1982 पासून शर्मा हे अचानक बेपत्ता झाले होते. त्यानंतर त्यांचा शोधशोध घेतला असता कोणताही ठावठिकाणा लागला नाही. 1982 मध्ये शर्मा यांच्या कुटुंबियांकडे पोलीस चौकशीसाठी आले होते. तेव्हा पोलिसांनी गजानंद यांच्या राष्ट्रीयतेबद्दल चौकशी केली. तेव्हा ते पाकिस्तानच्या जेलमध्ये असल्याचं कळालं.

पाकिस्तानी कागदपत्रांच्या अनुसार गजानंद हे 'फाॅरनर्स एक्ट' मुळे तेथील जेलमध्ये बंद होते. काही दिवसांपूर्वीच परराष्ट्र राज्यमंत्री विके सिंह यांनी गजानंद शर्मा यांच्या सुटकेबद्दल घोषणा केली होती. गजानंद शर्मा यांची पत्नी मक्खी देवी यांनी पतीच्या सुटकेबद्दल आनंद व्यक्त केला. 7 मे 2018 रोजी गजानंद शर्मा जिवंत असून ते पाकिस्तानच्या जेलमध्ये असल्याची माहिती मिळाली होती. आता त्यांच्या सुटकेमुळे शर्मा यांच्या गावात आनंदाचे वातावरण आहे.

पाकिस्तानच्या कागदपत्रात गजानंद यांच्या गावाचा पत्ता जयपूर जिल्ह्यातील सामोद तालुका महारकला गाव सांगण्यात आलंय. पोलिसांनी आपल्या रिपोर्टमध्ये गजानंद यांचं कुटुंब जयपूर येथील ब्रम्हपुरी येथील रहिवाशी होते.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 13, 2018 06:19 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...