S M L

पाकिस्तानात सत्ता बदलाची चिन्ह, इम्रान खानच्या पक्षाची आगेकूच

Updated On: Jul 25, 2018 09:33 PM IST

पाकिस्तानात सत्ता बदलाची चिन्ह, इम्रान खानच्या पक्षाची आगेकूच

इस्लामाबाद, ता. 25 जुलै : पाकिस्तानात आज झालेल्या मतदानाची मोजनी सुरू झाली आहे. सुरवातीचे कल इम्रान खानच्या पीटीआय पक्षाच्या बाजूने असून ही बातमी लिहीपर्यंत पीटीआय 65 जागांवर आघाडीवर होता तर नवाज शरीफ यांचा पक्ष 50 जागांवर आघाडीवर होता. तर पाकिस्तान पीपल्स पार्टी तिसऱ्या क्रमांकावर असून त्या पक्षाल 30 जागांची आघाडी आहे. आज मतदानादरम्यान क्वेटा इथं झालेल्या आत्मघातकी बॉम्बस्फोटात 30 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला. पाकिस्तानच्या इतिहासात पहिल्यांदाच लोकनियुक्त सरकारनं पाच वर्ष पूर्ण केले असून लोकशाही मार्गानं दुसरं सरकार येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

पैसे बुडवून विदेशात पळणाऱ्यांची आता खैर नाही, नव्या कायद्याला मंजूरी

मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढाच!, शिवसेना आमदाराचा राजीनामा

भ्रष्टाचाराच्या आरोपावरून नवाज शरीफ आणि त्यांची कन्या सध्या जेलमध्ये आहेत. लंडनवरून शरीफ लाहोरमध्ये आले आणि त्यांनी अटक करून घेतली. या निवडणूकीत सहानुभूतीचा फायदा मिळेल असा अंदाज त्यांना होता. त्यामुळे शरीफ यांनी पकिस्तानात येण्याचं धाडस केलं. मात्र सुरवातीचे जे कल हाती आले त्यात त्यांचा अंदाज चुकणार अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

चर्चा अर्जुन तेंडुलकरची, पण भाव खाल्ला अकोल्याच्या अर्थवने!

Loading...

सेंट झेविअर्स कॉलेजच्या 150 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच मराठी प्राचार्य

तर पीटीआय या इम्रान खानच्या पक्षाला पाकिस्तानी लष्कराची फुस असल्याचा आरोप होतोय. लष्कर पीटीआयला हाताशी धरून राजकारण करत असल्याचा आरोप नवाज शरीफ यांनी केला तर शरीफ हे भारत धार्जिणे आहेत असा आरोप इम्रान खान यांनी केला आहे. गुरूवारी सकाळपर्यंत पाकिस्तानातलं चित्र स्पष्ट होणार आहे.

 

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 25, 2018 09:33 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close