मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

झालं काय? मॅच सुरू असतानाच पाकिस्तानी खेळाडू मैदानातून थेट हॉस्पिटलमध्ये दाखल

झालं काय? मॅच सुरू असतानाच पाकिस्तानी खेळाडू मैदानातून थेट हॉस्पिटलमध्ये दाखल

मॅच सुरू असताना त्याची प्रकृती खालावली. त्यामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. तेथे तपासणीत त्याला व्हायरल इन्फेक्शन झाल्याचं समोर आलं. त्यानंतर रात्रभर हॉस्पिटलमध्येच राहण्याचा सल्ला देण्यात आला होता.

मॅच सुरू असताना त्याची प्रकृती खालावली. त्यामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. तेथे तपासणीत त्याला व्हायरल इन्फेक्शन झाल्याचं समोर आलं. त्यानंतर रात्रभर हॉस्पिटलमध्येच राहण्याचा सल्ला देण्यात आला होता.

मॅच सुरू असताना त्याची प्रकृती खालावली. त्यामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. तेथे तपासणीत त्याला व्हायरल इन्फेक्शन झाल्याचं समोर आलं. त्यानंतर रात्रभर हॉस्पिटलमध्येच राहण्याचा सल्ला देण्यात आला होता.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Lanja, India

नवी दिल्ली, 01 ऑक्टोबर : क्रिकेटविश्वातील एक धक्कादायक गोष्ट पाकिस्तानविरुद्ध इंग्लंड या मॅचमध्ये पाहायला मिळाली. कारण ही मॅच सुरू असतानाच पाकिस्तानच्या एका खेळाडूला मैदानातून थेट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. हैदर अली असं या खेळाडूचं नाव आहे. या प्रकारानंतर मात्र पुन्हा एकदा खेळाडूंच्या फिटनेसबद्दल चर्चा सुरू झाली असून, टी-20 वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धा सुरू होण्यापूर्वी पाकिस्तानच्या टीमला बसलेला हा मोठा धक्का मानला जातोय.

पाकिस्तानच्या टीमवर मोठं संकट आलंय. इंग्लंडविरुद्धच्या सहाव्या टी-20 मॅचदरम्यान पाकिस्तानचा खेळाडू हैदर अलीची प्रकृती इतकी बिघडली की, त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. अलीची प्रकृती आधीच थोडी खराब होती. त्यानंतरही त्याला टीममध्ये घेण्यात आलं. मॅच सुरू असताना त्याची प्रकृती खालावली. त्यामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. तेथे तपासणीत त्याला व्हायरल इन्फेक्शन झाल्याचं समोर आलं. त्यानंतर अलीला रात्रभर हॉस्पिटलमध्येच राहण्याचा सल्ला देण्यात आला होता.

इंग्लंडचा सहज विजय -

हैदर अलीला जी मॅच सुरू असताना हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट करण्यात आलं ती पाकिस्तानची टीम हरली. प्रथम बॅटिंग करताना पाकिस्तानने 6 विकेट गमावत 169 धावा केल्या. पाकिस्तानने या मॅचमध्ये त्यांचा स्टार बॅट्समन मोहम्मद रिझवानला विश्रांती दिली आणि त्याच्या जागी पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आझमसोबत मोहम्मद हरिस ओपनिंगला आला. पण पाकिस्तानची सुरुवात अत्यंत खराब झाली. टीमचे 15 रन असतानाच हरिस आणि शान मसूदच्या विकेट पडल्या. यानंतर बाबरला हैदरची साथ मिळाली, पण दोघांची भागीदारी फार काळ टिकली नाही. हैदरला केवळ 18 रन करता आल्या, तर बाबरने 87 धावांची खेळी केली, आणि 20 ओव्हरमध्ये पाकिस्ताननं 169 रन करीत इंग्लंडसमोर 170 रनांचं लक्ष्य ठेवलं.

हे वाचा - वर्षभरात 5 टी20, वर्ल्ड कपमधूनही आऊट, बुमराचं स्ट्रेस फ्रॅक्चर म्हणजे नक्की काय?

इंग्लंडने हे लक्ष्य 2 विकेट गमावत व 33 बॉल शिल्लक असतानाचा सहज पूर्ण केलं, व इंग्लंडने 7 सामन्यांच्या सीरिजमध्ये 3-3 अशी बरोबरी साधली. इंग्लंडचा फलंदाज फिल सॉल्टने स्फोटक बॅटिंग केली, त्याने 41 बॉलमध्ये 13 चौकार आणि 3 षटकार मारत 88 धावा केल्या.

हे वाचा - टी20 वर्ल्ड कप जिंकणाऱ्या टीमला किती बक्षिस मिळतं? ICC नं जाहीर केली माहिती

पाकिस्तानचा आणखी एक खेळाडू आजारी

पाकिस्तानी टीममधील हैदर अलीशिवाय नसीम शाह याचीही तब्येत खराब आहे. नसीमला कोरोना झाला असून तो इंग्लंडविरुद्धच्या सीरिजमधून बाहेर पडला आहे. त्याला या पूर्वी न्यूमोनिया झाला होता, त्यातून तो सावरण्यापूर्वीच त्याला कोरोनानं गाठले. दरम्यान लवकरच टी-20 वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धा सुरू होत आहे. त्यातच पाकिस्तानच्या टीमला एका पाठोपाठ एक धक्के बसत आहेत.

First published:

Tags: Cricket, Cricket news, Pakistan