पाकिस्तान, 29 ऑक्टोबर : पाकिस्तानमध्ये 15 वर्षाच्या शीख मुलीवर बलात्कार करण्यात आला आहे. मनुष्यात किती मोठा हैवान लपलेला आहे याचं हे जिवंत उदाहरण आहे. रविवारी झालेल्या धक्कादायक घटनेमध्ये पोलिसांनी सांगितलं की पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात एका रुग्णावाहिकेमध्ये 15 वर्षांच्या शीख मुलीवर बलात्कार करण्यात आला आहे.
या घटनेत 2 आरोपींची नावं समोर आली आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी मनोरुग्ण असल्याचं सांगण्यात येत आहे. ती ननकाना साहिब शहरात असलेल्या एका गुरूद्वारातून शनिवारी बेपत्ता झाली. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. तर मुलीच्या वडिलांच्या सांगण्यानुसार, ननकावा बायपासवर पंजाब रुग्णवाहिकेमध्ये ती सापडली.
बिझनेस पार्टनरची हत्या करून 25 तुकडे केले, पत्नीचाही काढला काटा
पीडितेच्या वडिलांनी सांगितलं की, 'आम्ही रुग्णवाहिकेमध्ये एका मुलीच्या ओरडण्याचा आवाज ऐकला. आम्ही तात्काळ रुग्णवाहिकेकडे धाव घेतली आणि पाहिलं तर ती माझीच मुलगी होती. काही लोक तिचं लैंगिक शोषण करत होते. तितक्यात आरोपींनी गाडी सुरू केली. 2 किलोमीटरवर नेऊन मुलीला गाडीबाहेर फेकलं आणि त्यांनी पळ काढला.'
या प्रकरणात अहसान अली आणि समीन हैदर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे दोघेही सरकारी कर्मचारी आहेत. तर पोलिसांनी सापळा रचून या दोघांनाही ताब्यात घेतलं आहे अशी माहिती ननकाना शहर पोलीस अधिकारी नदीम अहमद यांनी दिली.
पण या सगळ्यामुळे परिसरात मोठं संतापाचं वातावरण आहे. तर आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी समरो येत आहे. दरम्यान, या मुलीवर सध्या स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर आपल्या पोटच्या गोळ्याला अशा पद्धतीने कोणाचा शिकार होताना पाहिल्यामुळे पीडितेच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.
VIDEO : भाजप नेत्याने लगावले बार डान्सरसोबत ठुमके, उधळल्या नोटा!