मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

Pak Vs Eng 1st Test: पाकिस्तानचेही इंग्लंडला चोख प्रत्युत्तर, तीन फलंदाजांनी ठोकलं शतक

Pak Vs Eng 1st Test: पाकिस्तानचेही इंग्लंडला चोख प्रत्युत्तर, तीन फलंदाजांनी ठोकलं शतक

पहिल्या दिवशी इंग्लंडने पाकिस्तानच्या गोलंदाजांची धुलाई केली. त्यानंतर आता पाकिस्ताननेही चोख प्रत्युत्तर दिले असून तीन फलंदाजांनी शतके झळकावली आहेत.

पहिल्या दिवशी इंग्लंडने पाकिस्तानच्या गोलंदाजांची धुलाई केली. त्यानंतर आता पाकिस्ताननेही चोख प्रत्युत्तर दिले असून तीन फलंदाजांनी शतके झळकावली आहेत.

पहिल्या दिवशी इंग्लंडने पाकिस्तानच्या गोलंदाजांची धुलाई केली. त्यानंतर आता पाकिस्ताननेही चोख प्रत्युत्तर दिले असून तीन फलंदाजांनी शतके झळकावली आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Suraj Yadav

रावळपिंडी, 03 डिसेंबर : इंग्लंडचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर असून गुरुवारपासून कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्याला सुरुवात झाली आहे. यात पहिल्याच दिवशी इंग्लंडने पाकिस्तानची जबरदस्त धुलाई करत ५०० धावा काढल्या. यात एकाच दिवशी चार फलंदाजांनी शतके केली. इंग्लंडला तरीही ६५७ धावाच करता आल्या. यानंतर मैदानात उतरलेल्या पाकिस्ताननेसुद्धा इंग्लंडला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. पाकिस्तानप्रमाणेच इंग्लंडचे गोलंदाजही दुसऱ्या दिवशी विकेटसाठी धडपडत होते. आता यजमान पाकिस्तान इंग्लंडच्या धावसंख्येच्या जवळ पोहोचण्याच्या प्रयत्नात असेल तर इंग्लंड पाकिस्तानला गुंडाळण्यासाठी प्रयत्नशील असेल.

तिसऱ्या दिवशी अब्दुल्ला शफीक नंतर इमाम उल हकने शतक करत पाकिस्तानच्या तिसऱ्या दिवसाची जबरदस्त अशी सुरुवात केली. शफीक आणि इमाम उल हक यांची द्विशतकी भागिदारी विल जॅक्सने तोडली. जॅक्सने शफीकला ११४ धावांवर बाद केलं. पाकिस्तानचा पहिला गडी २२५ धावांवर बाद झाला. त्यानंतर जॅक लीचने २४५ धावांवर इमाम उल हकला बाद केलं. त्याने १२१ धावा केल्या. तर इंग्लंडला तिसरा धक्का जॅक लीचने दिला. त्याने अजहर अलीला २७ धावांवर पायचित केलं.

हेही वाचा : चेंडूला चमकवण्यासाठी जो रूटने केला आगळा वेगळा प्रकार; चाहते म्हणाले, 'ही तर छेडछाड'

लंच ब्रेकनंतर बाबर आजम आणि शकीलने पाकिस्तानचा डाव सावरला. संघाची धावसंख्या ४०० च्या वर पोहोचली. पण शकील ९४ चेंडूत ३७ धावा काढून बाद झाला. त्यानंतर बाबर आजमसुद्धा काही वेळाने बाद झाला. त्याने १६८ चेंडूत १३६ धावा केल्या. तर मोहम्मद रिजवानला जेम्स अँडरसनने बाद केलं. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा पाकिस्तानने ७ बाद ४९९ धावा केल्या आहेत. अद्याप ते १५८ धावांनी पिछाडीवर आहेत.

हेही वाचा : विमानात जेवण नाही अन् आता लगेजही सापडेना; एअरलाइन्सवर भारतीय क्रिकेटपटू संतापला

इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत पहिल्याच दिवशी ५०६ धावा फलकावर लगावल्या होत्या. कोणत्याही संघाकडून कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी केलेल्या या सर्वाधिक धावा होत्या. मात्र दुसऱ्या दिवशी पाकिस्तानच्या गोलंदाजांनी इंग्लंडच्या फलंदाजांना बाद करत रोखण्यात यश मिळवलं. नसीम शाहने तीन तर जाहिद महमूदने ४ गडी बाद करत इंग्लंडला ६५७ धावांत गुंडाळले.

First published:

Tags: Cricket, England, Pakistan