सुंजवान दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तानचाच हात !

सुंजवान दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तानचाच हात !

सुंजवानमधल्या भारतीय लष्करी तळावरच्या हल्ल्यात पाकिस्तानचाच नापाक हात असल्याचं समोर आलंय...दहशतवादी हल्ल्याचे मास्टरमाईंड पाकिस्तानी लष्करी अधिकारी असल्याचे पुरावे नेटवर्क१८ च्या हाती लागलेत.

  • Share this:

13 फेब्रुवारी, नवी दिल्ली : सुंजवानमधल्या भारतीय लष्करी तळावरच्या हल्ल्यात पाकिस्तानचाच नापाक हात असल्याचं समोर आलंय...दहशतवादी हल्ल्याचे मास्टरमाईंड पाकिस्तानी लष्करी अधिकारी असल्याचे पुरावे नेटवर्क१८ च्या हाती लागलेत. पाकिस्तानी ऑर्डिनन्स कॉर्पचा अधिकारी नबील उर्फ साकिब, पाकिस्तानी लष्करातल्या एसएसजीचा अधिकारी असिफ अली आणि अब्दुर रझाक, लेफ्टनंट अतिक अवान, कॅप्टन उसामा यांचा यात समावेश आहे..शनिवारी झालेल्या या हल्ल्यात सात जणांचा मृत्यू झाला होता.

दरम्यान, भारताच्या संरक्षणमंत्री निर्मला सितारामण यांनी पाकिस्तानला या हल्ल्याची किंमत चुकवावी लागेल, असं कालच म्हटलं होतं. त्यानंतर आज लगेच या हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचे पुरावे समोर आलेत. त्यामुळे भारतीय लष्कर या हल्ल्याचा बदला नेमका कशी पद्धतीने चुकता करतंय हे पाहावं लागेल.

First published: February 13, 2018, 4:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading