India-Pak Tension : भारताचं विमान आम्ही पाडलं नाही, पाकिस्तान तोंडघशी

India-Pak Tension : भारताचं विमान आम्ही पाडलं नाही, पाकिस्तान तोंडघशी

बडगाममध्ये भारताचे विमान कोसळल्यानंतर पाकिस्तानने विमान पाडल्याचा दावा केला होता.

  • Share this:

नवी दिल्ली, 27 फेब्रुवारी : पाकिस्तानने भारताची विमानं पाडल्याचा दावा भारताने फेटाळून लावला होता. आता यावर पाकिस्तान तोंडघशी पडलं असून पाकिस्तानी लष्कराच्या प्रवक्त्यांनी भारताच्या बडगाममधील विमान कोसळण्याच्या घटनेत आमचा हात नसल्याचं सांगितलं आहे.

दरम्यान, पाकिस्तानचं एफ -16 हे विमान भारताच्या हद्दीत घुसलं होतं. पण भारताने नौशेरा क्षेत्रात हे विमान पाडलं. पाकिस्तानच्या विमानाने हवाई हद्दीत घुसून बॉम्बहल्ला केला पण यात कोणीही जखमी झालं नाही, असं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

पाकिस्तानचं विमान पाडण्यात आल्यानंतर या विमानातून पॅराशूट खाली येताना दिसलं पण पायलटचं नेमकं काय झालं ते कळू शकलं नाही. भारताची दोन विमानं पाकिस्तानने पाडली आणि भारतीय पायलटला अटक करण्यात आली, असा दावा पाकिस्तानने केला होता. पण हा दावाही भारताने फेटाळून लावला आहे.

पहिल्यांदा पाकिस्तानच्या लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल असिफ गफूर यांनी ट्विटरवरून, काश्मीरमध्ये भारताचं विमान पडल्याचा दावा केला होता. त्याचबरोबर भारताने आज दुसऱ्यांना नियंत्रण रेषा पार केली, असंही त्यांनी म्हटलं होतं. पण आता त्यांनी बडगाममधील भारताच्या विमान कोसळण्याच्या घटनेत पाकिस्तानचा हात नसल्याचे म्हणत घुमजाव केलं आहे.

सीमेवर गोळीबार

गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घडामोडींमुळे काश्मिरातील वातावरण तापलं आहे. सीमेवर भारत आणि पाकिस्तानच्या सैन्यामध्ये सतत चकमकी सुरू आहेत. म्मू-काश्मीरमधील शोपियानमध्ये पाककडून गोळीबार करण्यात आला. त्याला भारतानेही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी भारताने पाकच्या 5 चौक्या उद्ध्वस्त केल्या तसंच पाकिस्तानचे काही सैनिकही मारले गेल्याची माहिती आहे. भारताने दहशतवाद्यांच्या तळावर हवाई हल्ला केल्यानंतर मंगळवारी संध्याकाळपासून पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात येत आहे. त्यानंतर भारतानेही चांगलंच प्रत्युत्तर दिलं आहे.

Army 'इन अॅक्शन', पहाटे दोन दहशतवाद्यांचा खात्मा

शोपियानमध्ये भारतीय लष्कराने दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. शोपियानमध्ये पहाटे दहशतवादी आणि लष्करामध्ये बराच वेळ चकमक सुरू होती. या चकमकीत लष्कराने दोन जवानांना कंठस्नान घातलं आहे.

भारताची 2 विमानं पाडून एका वैमानिकाला अटक केली, पाकिस्तानचा दावा

' आम्ही भारताची 2 विमानं पाडून एका वैमानिकाला ताब्यात घेतलं आहे,' असा दावा पाकिस्तानने केला आहे. काही वेळापूर्वी भारताची दोन विमानं काश्मीरमध्ये कोसळली आहेत. ही विमानं आम्हीच पाडली आहेत, असा दावा पाकच्या लष्कराने केला आहे.

Breaking: भारताने पाकिस्तानचं F16 विमान पाडलं

भारताने पाकव्याप्त काश्मिरमध्ये केलेल्या एअर स्ट्राइकनंतर भारत- पाकिस्तानच्या एलओसीवर तणावाची परिस्थीती निर्माण झाली आहे. यात दर मिनिटाला नवीन अपडेट येत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय वायुसेनेने नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानचे फायटर जेट F16 पाडलं आहे. विमानातील सैनिक पॅराशूटमधून उतरताना दिसले. मात्र ते नक्की कोणत्या दिशेला गेले हे अजून कळू शकले नाही.

First published: February 27, 2019, 1:57 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading