पहलाज निहलानी यांनी कंगना रणौतला ऑफर केला होता ‘सॉफ्ट पॉर्न’ सिनेमा

पहलाज निहलानी यांनी कंगना रणौतला ऑफर केला होता ‘सॉफ्ट पॉर्न’ सिनेमा

कंगना फक्त या फोटोशूटबद्दलच बोलली नाही तर पहलाज यांनी कशाप्रकारे ‘सॉफ्ट पॉर्न’ करण्यासाठी तिला सांगितलं याचा किस्साही सांगितला.

  • Share this:

मुंबई, २९ मार्च- बॉलिवूडची क्वीन कंगना रणौत दरदिवशी काही ना काही ब्रेकिंग न्यूज देतच असते. आता तर कंगना आणि वाद या एकाच नाण्याच्या दोन बाजू झाल्या आहेत. नुकतंच तिने पहलाज निहलानी यांच्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. पहलाज यांनी तिला एका सिनेमासाठी अश्लिल फोटोशूट करायला सांगितलं होतं, असं कंगाना म्हणाली. यावेळी कंगना फक्त या फोटोशूटबद्दलच बोलली नाही तर पहलाज यांनी कशाप्रकारे ‘सॉफ्ट पॉर्न’ करण्यासाठी तिला सांगितलं याचा किस्साही सांगितला. कंगना सिनेसृष्टीत आपलं स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करत असताना तिच्यासोबत हा किस्सा झाल्याचं कंगनाने स्पष्ट केलं.

कंगना म्हणाला की, ऑफर केलेल्या सिनेमात तिला अंर्तवस्त्रांशिवाय कपडे घालण्यास सांगण्यात आले होते. या घटनेबद्दल बोलताना कंगना म्हणाला की, ‘त्यावेळी मला कळलं की माझे आई- वडील सिनेमात मला का पाठवत नव्हते. करिअरच्या सुरुवातीला तिला एक सिनेमाची ऑफर देण्यात आली होती. या सिनेमाचं नाव होतं, ‘लव्ह यू बॉस’ या सिनेमात एका मुलीचे आपल्या बॉसवर प्रेम असते असं दाखवण्यात आलं होतं.’

या सिनेमासाठी कंगनाला एक फोटोशूट करावं लागणार होतं. यासाठी पहलाज यांनी तिला एक ड्रेस घालायला सांगितला. हा ड्रेस अंतर्वस्त्रांशिवाय घालायला तिला सांगण्यात आले. तो ड्रेस गुडघ्यापर्यंतचा होता आणि सॅटीन मटेरियलचा तो ड्रेस होता.

कंगना स्वतः म्हणाली की तो सिनेमा सॉफ्ट पॉर्न प्रकारातला होता. याच कारणामुळे तिचे आई- वडील सिनेसृष्टीत तिला पाठवायला नकार द्यायचे असं ती म्हणाली. कंगना या फोटोशूटच्या मधूनच पळून गेली आणि तिने स्वतःचा फोन नंबरही बदलला. एवढं सगळं होऊनही कंगनाने स्वतःवरचा आत्मविश्वास गमावला नाही आणि ती ऑडिशन्स देत राहिली. याच सिनेमानंतर कंगनाला अनुराग बासुचा गँगस्टर आणि जगन्नाथ यांचा पोकिरी सिनेमा मिळाला. या सिनेमांनंतर तिने कधीही मागे फिरून पाहिलं नाही.

उत्तर मुंबई : उर्मिलाच्या राजकीय अंदाजासमोर विरोधकही धास्तावले

First published: March 29, 2019, 7:50 PM IST

ताज्या बातम्या