सिनेमात राणी पद्मावती आणि खिलजीचा एकही एकत्रित सीन नाही !

''या सिनेमात राणी पद्मावती आणि अल्लाउद्दिन खिल्जी यांचा एकही प्रसंग नाही. याउलट राजपूतांचा इतिहास, राजपूतांची तत्व आणि त्यांची शौर्यगाथा, राणी पद्मावतीची स्वाभिमानाची लढाई आणि अल्लाउद्दिन खिल्जी याची साम्राज्य वाढवण्याची आसक्ती आणि अवास्तव ईर्षा याचं दर्शन यात आहे.''

Chandrakant Funde | Updated On: Jan 23, 2018 10:36 PM IST

सिनेमात राणी पद्मावती आणि खिलजीचा एकही एकत्रित सीन नाही !

23 जानेवारी, मुंबई : करणी सेनाने 'पद्मावत' या सिनेमाला केलेला विरोध हा किती बिनबुडाचा आहे हेच पद्मावत हा सिनेमा पाहिल्यानंतर प्रेक्षकांच्या लक्षात येईल. पत्रकारांसाठीच्या खास स्क्रिनिंगनंतर आमची विशेष प्रतिनिधी नीलिमा कुलकर्णी यांची ही प्रतिक्रिया, ''या सिनेमात राणी पद्मावती आणि अल्लाउद्दिन खिल्जी यांचा एकही प्रसंग नाही. याउलट राजपूतांचा इतिहास, राजपूतांची तत्व आणि त्यांची शौर्यगाथा, राणी पद्मावतीची स्वाभिमानाची लढाई आणि अल्लाउद्दिन खिल्जी याची साम्राज्य वाढवण्याची आसक्ती आणि अवास्तव ईर्षा याचं दर्शन यात आहे.

संजय लीला भंसाळी यांचं संगीत आणि दिग्दर्शन असलेला सिनेविश्वातला हा आणखी एक मैलाचा दगड म्हणावा लागेल. कारण ज्या भव्यदिव्य आणि नेत्रदिपक पद्धतीने त्यांनी राणी पद्मावतीची कथा यात दाखवलीय, ती डोळ्याचं पारणं फेडणारी आहे. रणवीर सिंग, दीपिका पदूकोण यांचा अभिनय अतिशय दमदार आहे. तर शाहिद कपूरने त्याची भूमिका चोखपणे निभावली असली तरीही रणवीर-दीपिका यांच्या तुलनेत तो थोडा कमी पडतो असं वाटत राहतं.

'व्हिएफएक्स'चा उत्तम वापर करण्यात आलाय. युद्धांचे प्रसंग प्रेक्षकांना खुर्चीत खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरतील. एकंदर राजपूतांचा गौरव दाखवणारी ही प्रेमकथा आणि शौर्यकथा 25 जानेवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. पद्मावत हा सिनेमा मलिक मोहम्मद जायसी यांच्या पद्मावत या महाकाव्यावरून प्रेरित आहे. संजय लीला भंसाळींचा हा एपिक ड्रामा चुकवू नये, हे मात्र नक्की.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 23, 2018 10:36 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close