राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात, गोवामध्ये पद्मावत प्रदर्शित होणार नाही !

राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात, गोवामध्ये पद्मावत प्रदर्शित होणार नाही !

संजय लिला भन्साळी दिग्दर्शित पद्मावत सिनेमाला करणीसेनेकडून होणारा हिंसक विरोध अजूनही कमी होत नसल्याने चार राज्यांमध्ये हा सिनेमाच तुर्तास प्रदर्शित न करण्याचा निर्णय ऑल इंडिया मल्टिप्लेक्स असोशिएशननं घेतला आहे. करणीसेनेच्या तीव्र मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान आणि गोवा या चार राज्यांमधे पद्मावत सिनेमा रिलीज होणार नाही. मल्टीप्लेक्स असोशिएशननेच यासंबंधीचा निर्णय जाहीर केलाय.

  • Share this:

24 जानेवारी, नवी दिल्ली : संजय लिला भन्साळी दिग्दर्शित पद्मावत सिनेमाला करणीसेनेकडून होणारा हिंसक विरोध अजूनही कमी होत नसल्याने चार राज्यांमध्ये हा सिनेमाच तुर्तास प्रदर्शित न करण्याचा निर्णय ऑल इंडिया मल्टिप्लेक्स असोशिएशननं घेतला आहे. करणीसेनेच्या तीव्र मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान आणि गोवा या चार राज्यांमधे पद्मावत सिनेमा रिलीज होणार नाही. मल्टीप्लेक्स असोशिएशननेच यासंबंधीचा निर्णय जाहीर केलाय.

 

दरम्यान, उत्तर भारतात बहुतांश राज्यांमध्ये हा सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच करणीसेनेनं हिंसक आंदोलनाला सुरूवात केलीय. दिल्लीच्या गुरूग्राममध्ये तर थेट स्कूलबसच पेटवून देण्यात आलीय. भोपाळ, लखनौ, गुडगाव याठिकाणीही जाळपोळ आणि तोडफोडीसारखी हिंसक आंदोलनं सुरूच आहे.

सुप्रीम कोर्टाने परवानगी दिली असली आमचा या सिनेमाला विरोध राहणारच, अशी ताठर भूमिका लोकेंद्र सिंह यांनी आज पुन्हा जाहीर केलीय. त्यामुळे करणीसेना समर्थकांनी देशभरात पुन्हा ठिकठिकाणी पद्मावती सिनेमाच्या प्रदर्शनाच्या विरोधात एक दिवस आधीच हिंसक आंदोलन हाती घेतलंय. या पार्श्वभूमीवरच मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरात आणि गोवा या चार राज्यांमध्ये हा सिनेमा प्रदर्शित न करण्याचा निर्णय ऑल इंडिया मल्टिप्लेक्स संघटनेनं घेतलाय.

 

 

 

First published: January 24, 2018, 8:03 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading