S M L

पोलीस बंदोबस्तात पद्मावत राज्यभरात प्रदर्शित, सर्व शोज हाऊसफुल्ल

मुंबई पुण्यासह आज राज्यभरात कडक बंदोबस्तात पद्मावत सिनेमाचे शोज सुरू आहेत. मुंबई, पुणे, नाशिकमध्ये अनेक मल्टिप्लेक्सेस बाहेर कडक पोलीस बंदोबस्त करण्यात आलाय. पहिला शो सकाळी आठ वाजताच सुरू झाला. महागडी तिकिटं असूनही आणि करणीसेनेची बंदी झुगारून प्रेक्षकांनी बहुतांश शोज हाऊसफूल केलेत.

Chandrakant Funde | Updated On: Jan 25, 2018 10:53 AM IST

पोलीस बंदोबस्तात पद्मावत राज्यभरात प्रदर्शित, सर्व शोज हाऊसफुल्ल

25 जानेवारी, मुंबई : मुंबई पुण्यासह आज राज्यभरात कडक बंदोबस्तात पद्मावत सिनेमाचे शोज सुरू आहेत. मुंबई, पुणे, नाशिकमध्ये अनेक मल्टिप्लेक्सेस बाहेर कडक पोलीस बंदोबस्त करण्यात आलाय. पहिला शो सकाळी आठ वाजताच सुरू झाला. महागडी तिकिटं असूनही आणि करणीसेनेची बंदी झुगारून प्रेक्षकांनी बहुतांश शोज हाऊसफूल केलेत. सुप्रीम कोर्टानं हिरवा कंदील दाखवूनही राजपूत करणी सेना चित्रपटाला विरोध करतेय. कालच्या जाळपोळीनंतर मल्टिप्लेक्स असोसिएशननं गुजरात, मध्य प्रेदश, राजस्थान, हरियाणा आणि गोवा या राज्यांमध्ये सिनेमा प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतलाय. दरम्यान, काल दिल्लीत एका स्कूलवरच आंदोलकांनी दगडफेक केल्याने देशभरातून तीव्र संताप व्यक्त होतोय. सुप्रीम कोर्टाने बंदी उठवूनही करणीसेना नेमकी कोणाच्या जीवावर कायदा हातात घेतेय. असा सवाल विचारला जातोय. विशेषतः भाजपशासित राज्यांमध्ये सरकारकडूनही या आंदोलकांना मोकळीक दिली जात असल्याचा आरोप होतोय. किंबहुना या चार राज्यांमध्ये मल्टिप्लेक्स असोशिएशनच्या आडून सरकारच पद्मावत सिनेमावर अघोषित बंदी आणू पाहत असल्याचा गंभीर आरोप होतोय.

 

Loading...

इकडे राज्यातही औरंगाबाद आणि नागपूरमध्ये विविध संघटनांनी पद्मावतच्या प्रदर्शनाला विरोध केल्याने तिथं कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय. देशभरातल्या तब्बल 8 हजार स्क्रिन्सवर आज हा सिनेमा रिलीज होणार होता पण करणीसेनेच्या विरोधामुळे गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान, हरियाणा आणि गोवा या पाच राज्यांमध्ये हा सिनेमा रिलीज होऊ शकलेला नाही. परिणामी आजमितीला या सिनेमाला पहिल्या दिवशी निम्मी देखील म्हणजेच 4500 स्क्रिन्स मिळणं अवघड होऊन बनलंय. हा सिनेमा करणीसेनेच्या विरोधामुळे प्रारंभीपासूनच चर्चेत राहिल्याने प्रेक्षकांची उत्सुकता खूपच वाढलीय. करणीसेनेचा विरोध झुगारून प्रेक्षक मल्टिप्लेक्समध्ये सिनेमा पाहण्यासाठी गर्दी करताहेत. त्यामुळे सिनेमाचं पहिल्या तीन दिवसांचं बुकिंगही आत्ताच हाऊसफूल्ल झालंय. परिणामी सिनेमाचे तिकीट दर गगणाला भिडलेत.

पद्मावत तिकिटाचे पहिल्या दिवशीचे दर

मुंबई

एट्रिया मॉल Rs 1050 ते Rs 1550.

फिनिक्स मार्केट सिटी,कुर्ला - Rs 780.

ओबेरॉय मॉल, गोरेगाव - Rs 730.

रघुलीला मॉल, वाशी - Rs 800.

पीवीआर, वर्सोवा - Rs 1530.

पीवीआर फिनिक्स - Rs 900.

दिल्ली

पीवीआर एम्बिअन्स Rs 2200 ते Rs 2400.

पुणे

आयनॉक्स, इन्सिनिया - Rs 730.

कोलकाता

क्वेस्ट, इन्सिनिया - Rs 1050.

बंगळुरू

पीवीआर, कोरामंगला Rs 1100 ते Rs 1200

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 25, 2018 10:03 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close