नेत्यांनो इथेही लक्ष द्या, निवडणुकीच्या कामांमुळे शेतकऱ्यांचं सगळ्यात मोठं नुकसान!

निवडणुकींच्या कामामुळे तालुक्यातील भातपिकावरील किड नियंत्रणाकडे सपशेल दूर्लक्ष झालं.

News18 Lokmat | Updated On: Oct 22, 2019 06:29 PM IST

नेत्यांनो इथेही लक्ष द्या, निवडणुकीच्या कामांमुळे शेतकऱ्यांचं सगळ्यात मोठं नुकसान!

शैलेश पालकर, प्रतिनिधी

पोलादपुर, 22 ऑक्टोबर : पोलादपूर तालुका कृषी कार्यालयाचे सर्वच कर्मचारी विधानसभा निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्यामुळे शेतकऱ्यांचं सगळ्यात मोठं नुकसान झालं आहे. निवडणुकींच्या कामामुळे तालुक्यातील भातपिकावरील किड नियंत्रणाकडे सपशेल दूर्लक्ष झालं. त्यामुळे तब्बल 50 ते 75 टक्के शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेलं पीक लष्करी आळी आणि तुडतुडयांकडून फस्त झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर विविध जबाबदाऱ्या आणि प्रशिक्षणासाठी तालुका कृषी कार्यालयाचे सर्वच कर्मचारी निवडणुक विभागाने पाचारण केले होते. ते निवडणुकीच्या कामात व्यस्त राहिल्यामुळे तालुका कृषी कार्यालयामार्फत यंदा भातपिक संरक्षण सप्ताहाचे आयोजन करण्यात आलं नाही. कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, कृषीमंडळ अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी या सर्वांनाच निवडणुकीसाठी नियुक्तया देण्यात आल्याने तालुक्यातील संपूर्ण शेती रामभरोसे ठेवण्यात आली.

पावसाने यावर्षी उच्चांक प्रस्थापित करीत आजतागायत विश्रांती न घेतल्याने फवारलेली किटकनाशके पिकांवरून वाहून गेली आणि भातपिकांवर मोठया प्रमाणात लष्करी आळी आणि तुडतुडयांचा प्रादूर्भाव झाला.  भाताच्या लोंब्या आलेल्या भातपिक आळ्यांनी फस्त केलं. अनेक ठिकाणी खाचरात ऑक्टोबर हिटच्या टळटळीत उन्हामध्ये वाळण्यासाठी टाकलेल्या पिकावर पाऊस पडून उन्हामुळे भात शिजल्याचा घमघमाट पसरलेला. त्यामुळे हे भातपिकही वाया जाणार असल्याने शेतकरीराजा चिंतेत आहे.

इतर बातम्या - मतदानानंतर EVM विरोधात काँग्रेसची नवी मागणी, निवडणूक आयोगाला पाठवलं पत्र!

Loading...

पोलादपुर तालुक्यातील देवळे, करंजे गावांमध्ये सुमारे शंभर ते दिडशे एकर झालेल्या भातशेतीला गेल्या पंधरा- वीस दिवसांपासून निस्तेज असं पिवळं आणि करपल्यासारखं रुप आलं आहे. त्यावर किटकनाशक फवारणी करुनही पावसाने संततधार धरल्याने किटकनाशके वाहून जात किडयांचा प्रबळ प्रादूर्भाव होत आहे. त्यामुळे भातपिक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.

इतर बातम्या - VIDEO: मुंबई पोलिसांना जबर मारहाण, संतप्त नागरिकांनी फोडल्या गाड्या

आतापर्यंत पोलादपूर तालुक्यामध्ये दरवर्षी पडणाऱ्या पावसाच्या तुलनेत सर्वाधिक 5800 मी.मी. पावसाची नोंद झाली. सरकारने या भातपिकाची नुकसानभरपाई देण्यासाठी तातडीने नुकसानीचे पंचनामे हाती घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

मात्र, अद्याप महाड विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीचेही काम महसुल कर्मचाऱ्यांसह कृषी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना करावं लागणार असल्याने या भातशेती नुकसानीचे पंचनामे करण्यास विलंब होण्याची चिन्हं दिसत आहेत. त्यामुळे आता शेतकऱ्यांची दिवाळी दुखात जाणार असंच म्हणावं लागेल.

इतर बातम्या - बालपणाच्या मैत्रीवर अपघाताने घातला घाला, 3 मित्रांचा जागीच मृत्यू

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 22, 2019 06:29 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...