तस्लिमा नसरीन तुमची बहिण तर रोहिंग्या भाऊ का नाही ? - ओवैसी

'जर बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन बहिण होऊ शकते तर रोहिंग्या भाऊ का होऊ शकत नाही?, 'असा परखड सवालच ओवेसी यांनी केंद्र सरकारला केलाय.

Chandrakant Funde | News18 Lokmat | Updated On: Sep 15, 2017 06:34 PM IST

तस्लिमा नसरीन तुमची बहिण तर रोहिंग्या भाऊ का नाही ? - ओवैसी

हैदराबाद, 15 सप्टेंबर : शरणार्थी रोहिंग्या मुस्लिमांना परत पाठवण्याच्या मुद्यावरून 'एमआयएम'चे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. 'जर बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन बहिण होऊ शकते तर रोहिंग्या भाऊ का होऊ शकत नाही?, 'असा परखड सवालच ओवेसी यांनी केंद्र सरकारला केलाय. केंद्र सरकारने रोहिंग्यांना भारतात वास्तव्य करू द्यावे असेही त्यांनी म्हटले आहे.

म्यानमारमधील 40 रोहिंग्या मुस्लिमांनी भारतात ठिकठिकाणी आश्रय घेतलाय. पण या रोहिंग्या मुस्लिमांचे दहशतवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप करत केंद्र सरकारने या सर्वांना परत पाठवण्याचा निर्णय घेतलाय. त्याला ओवैसींनी कडाडून विरोध केलाय. बांगलादेशी, पाकिस्तानी आणि तमिळ शरणार्थियांना भारतात राहण्याची परवानगी असेल तर रोहिंग्यांना का नाही?, असेही ओवेसी म्हणाले.

हैदराबादच्या एका सभेत बोलताना ओवेसी म्हणाले, आपण मन मोठे करून रोहिंग्याला आश्रय द्यायला हवा. जर लाखो लोक शरणार्थी म्हणून भारतात राहत असतील तर ४० हजार रोहिंग्यांनाही भारतात राहण्याची परवानगी द्यायला हवी. ज्या लोकांकडे काहीच नाही, त्यांना परत पाठवण्यासाठी सरकार का प्रयत्न करतेय?, असा सवालही त्यांनी विचारला. ओवैसींनी यावेळी तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांना आश्रय देण्यात आल्याचीही सरकारला आठवण करून दिली. आपल्या संविधानाने समानता आणि जीवन जगण्याचा अधिकार दिला असून तो केवळ देशाच्या नागरिकांना नाही तर तो शरणार्थियांनाही दिल्याचे ओवेसी यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 15, 2017 06:34 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...